मेघालयमध्ये त्रिशंकू अवस्था, काँग्रेस सर्वात मोठा पक्ष

मेघालय विधानसभेत सध्या त्रिशंकू अवस्था पाहायला मिळत आहे. मेघायल विधानसभेच्या 60 जागांसाठी सध्या मतमोजणी सुरु असून काँग्रेस 21 जागांवर पुढे आहे.

By: | Last Updated: 03 Mar 2018 12:54 PM
मेघालयमध्ये त्रिशंकू अवस्था, काँग्रेस सर्वात मोठा पक्ष

शिलाँग : मेघालय विधानसभेत सध्या त्रिशंकू अवस्था पाहायला मिळत आहे. मेघायल विधानसभेच्या 60 जागांसाठी सध्या मतमोजणी सुरु असून काँग्रेस 21 जागांवर पुढे आहे. तर एनपीपी 18 जागांवर पुढे आहे. तर 14 इतर उमेदवार देखील सध्या आघाडीवर आहेत. त्यामुळे आता सत्तेसाठी काँग्रेस कोणाला सोबत घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

2009 पासून मेघालयमध्ये काँग्रेसचं सरकार असून मुकुल संगमा हे मुख्यमंत्री आहे. 2013 साली काँग्रेसला 60 पैकी 29 जागांवर विजय मिळाला होता पण आता काँग्रेस सध्या काहीशी मागे पडली आहे. पण सध्याचे कल पाहता काँग्रेस मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेघालयात काँग्रेस सत्ता स्थापन करु शकतं.

दरम्यान, मेघालयात काँग्रेसचा पराभव करण्यासाठी भाजपने बराच प्रयत्नही केला होता. मात्र, इथं भाजपला म्हणावं तसं यश आलं नाही.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: meghalaya assembly vidhansabha election live update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV