लव्ह जिहाद मुद्दा राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादाशी निगडीत : रवीशंकर प्रसाद

लव्ह जिहाद देशातील मोठा प्रश्न असून या माध्यमातून तरुणांना भडकवण्याचं काम केलं जात असल्याचा दावा रवीशंकर प्रसाद यांनी केला.

लव्ह जिहाद मुद्दा राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादाशी निगडीत : रवीशंकर प्रसाद

नवी दिल्ली : लव्ह जिहाद हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादाशी निगडीत असल्याचा दावा केंद्रीय कायदे मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केला आहे.  नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत रविशंकर प्रसाद बोलत होते.

लव्ह जिहादच्या माध्यमातून केरळमध्ये दहशतवादी कृत्यांना चालना दिलं जात असल्याचं त्यांनी नमूद केल. लव्ह जिहाद देशातील मोठा प्रश्न असून या माध्यमातून तरुणांना भडकवण्याचं काम केलं जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

काही दहशतवादी इस्लामिक स्टेटची केरळमध्ये स्थापना करण्याच्या तयारीत आहेत. त्या माध्यमातून विदेशातून पैसे मिळवण्याचे ते प्रयत्न करत असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Minister Ravi shankar statement on love jihad
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV