पीएनबीच्या तीन विभागांमध्ये समन्वय नसल्याने घोटाळा?

तपास यंत्रणा सरकारला या घोटाळ्याबाबत अहवाल देणार आहेत.

पीएनबीच्या तीन विभागांमध्ये समन्वय नसल्याने घोटाळा?

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेत झालेल्या साडे अकरा हजार कोटींच्या घोटाळ्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीएनबी बँकेच्या तीन विभागांमध्ये समन्वय नव्हता. त्यामुळेच हा घोटाळा करणं शक्य झालं, अशी माहिती तपास यंत्रणांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे.

बँकेच्या मुख्य तीन विभागांमध्येच संवाद नसल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ऑडिटमध्येही या घोटाळ्याबाबत कधी माहिती समोर आली नाही. तपास यंत्रणा सरकारला या घोटाळ्याबाबत अहवाल देणार आहेत. त्यामुळे अंतर्गत विसंवादामुळे घोटाळा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या तीन विभागांमध्ये समन्वय नव्हता

स्विफ्ट मेसेज सिस्टम, कोअर बँकिंग आणि NASTRO अकाऊंट डिव्हिजन यांच्यात संपर्क नव्हता. हे बँकेचे प्रमुख तीन आधारस्तंभ आहेत.

स्विफ्ट मेसेज सिस्टम हा असा विभाग आहे, जो परदेशातील बँकेला हमी देतो. ही संपूर्ण संगणकीय सिस्टम असून याचा पासवर्ड दोन व्यक्तींकडे असतो.

कोअर बँकिंगचं स्वतःचं नेटवर्क आहे, ज्यामध्ये मोठी रक्कम मंजूर केल्याची माहिती असते. याचा पासवर्डही दोन जणांकडेच असतो.

NASTRO अकाऊंट डिव्हिजनकडे परदेशातील बँकेशी केलेल्या व्यवहाराची माहिती असते.

या तीन विभागांच्या बेजबाबदारपणामुळे घोटाळा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

संबंधित बातम्या :

पीएनबीने प्रकरण सार्वजनिक केल्याने देणं देऊ शकत नाही : नीरव मोदी


पीएनबी घोटाळा : छोटे मासे गळाला, 3 आरोपींना 14 दिवसांची CBI कोठडी

PNB चा तत्कालीन शाखा उपव्यवस्थापक गोकुळनाथसह तिघांना अटक

PNB घोटाळा : 5 हजार कोटींचा गैरव्यवहार एनडीएच्या काळात

PNB घोटाळा : नीरव मोदी, मेहुल चोक्सीचे पासपोर्ट रद्द

पीएनबी घोटाळा : अकरा हजार कोटी परत कसे मिळणार?

PNB घोटाळा : लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे काय?

PNB ला 11 हजार कोटींना गंडवणारे नीरव मोदी देशाबाहेर पळाले

पीएनबी घोटाळा : डायमंड किंग नीरव मोदीवर गुन्हा दाखल

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: miscommunication on PNB three department is responsible for scam says primary inquiry
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV