मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल

मिस वर्ल्डचं ऑफिशियल चॅनेलने यूट्यूबवर मानुषीच्या डान्सचा व्हीडीओ पोस्ट केला आहे. मानुषीच्या डान्सचा हा व्हिडीओ केवळ तीन दिवसात 1.2 मिलियनपेक्षा जणांनी पाहिला आहे.

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : मानुषी छिल्लरच्या रुपानं तब्बल 17 वर्षांनी भारताला मिस वर्ल्डचा किताब पटवकावण्यात यश आलं. पण सध्या मिस वर्ल्ड 2017 मानुषी वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आहे. तिच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चांगलाच हीट ठरतो आहे.

राम लीलातील ‘नगाडा’ गाण्यावर मानुषीनं ठेका धरला.पारंपरिक भारतीय पोशाखातील मानुषीनं सर्वांचीच मनं जिंकली.

मिस वर्ल्डचं ऑफिशियल चॅनेलने यूट्यूबवर मानुषीच्या डान्सचा व्हीडीओ पोस्ट केला आहे. मानुषीच्या डान्सचा हा व्हिडीओ केवळ तीन दिवसात 1.2 मिलियनपेक्षा जणांनी पाहिला आहे.

मिस वर्ल्डचा किताब पटकावल्यापासून सोशल मीडियात तिची जोरदार चर्चा सुरु आहे. तिने मिस वर्ल्डचा खिताब पटकावल्यानंतर, काँग्रेस नेते शशी थरुर यांनी एक ट्वीट केला होता. पण हे ट्वीट थरुर यांच्या चांगलंच अंगलट आलं.

या ट्वीटनंतर नेटीझन्सनी थरुर यांचा चांगलाच समाचार घेतला.

व्हिडीओ पाहा

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: miss world 2017 manushi chillar dance video viral
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV