अर्थ बजेटचा : 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार?

सध्या प्राप्तीकरातील सुटीची मर्यादा 2.5 लाख रुपयांपर्यंत आहे. पण यंदा ही मर्यादा 3 लाखांपर्यंत केली जाऊ शकते. असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अर्थ बजेटचा : 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार?

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे आज (गुरुवार) सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचं हे शेवटचं पूर्ण बजेट असल्याने यंदा सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की, मोदी सरकार प्राप्तिकराच्या सुटीची मर्यादा वाढवू शकतं. सध्या प्राप्तीकरातील सुटीची मर्यादा 2.5 लाख रुपयांपर्यंत आहे. पण यंदा ही मर्यादा 3 लाखांपर्यंत केली जाऊ शकते.

- 3 ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के कर आकारला जाऊ शकतो.

- 5 ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के टॅक्स आकारला जाऊ शकतो.

- तर 10 लाखांपेक्षा अधिकच्या उत्पन्नावर 30 टक्के टॅक्स लागू शकतो.

जर प्राप्तीकरातील सुटीची मर्यादा 50 हजारापर्यंत वाढविल्यास एसबीआयच्या एका रिपोर्टनुसार, एकूण 75 लाख करदात्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. पण त्यामुळे सरकारला तब्बल साडे नऊ कोटींचं नुकसान होऊ शकतं. नोटबंदीनंतर सरकारने 18 लाख नव्या लोकांना प्राप्तिकराच्या कक्षेत आणलं आहे.

अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमधील नेमकी शक्यता काय?

उत्पन्न (रु.)         सध्याच्या टॅक्स स्लॅब          उत्पन्न           संभावित टॅक्स स्लॅब

2-5 लाख               0 %                               2.5 लाख             0%      

2.5-5 लाख            10 %                            2.5-5 लाख          5%

5-10 लाख              20%                            5-7.5 लाख           10%

10 लाख +               30%                          7.5-10 लाख          20%

त्यामुळे आता अर्थमंत्री देशवासियांना नेमकी काय भेट देणार याकडेच सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: modi government may raise minimum income tax exemption limit to rupee three lakh latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV