'मेहरम' प्रथा बंद करण्याचं श्रेय मोदींनी घेऊ नये : ओवेसी

'परदेशी सरकारनं जे काम आधीच केलं आहे त्याचं श्रेय पंतप्रधान का घेत आहेत?' असा सवाल ओवेसींनी मोदींना विचारला आहे.

'मेहरम' प्रथा बंद करण्याचं श्रेय मोदींनी घेऊ नये : ओवेसी

नवी दिल्ली : तात्काळ तिहेरी तलाकनंतर मुस्लीम महिलांना हज यात्रेसाठी बंधनकारक असलेली ‘मेहरम’ प्रथा बंद करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून केली होती. त्यानंतर इंडिया मुस्लीम पर्सनल लॉसह एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींच्या या घोषणेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

'परदेशी सरकारनं जे काम आधीच केलं आहे त्याचं श्रेय पंतप्रधान का घेत आहेत?' असा सवाल ओवेसींनी मोदींना विचारला आहे.

सौदी हज अथॉरिटीनं आधीच परवानगी दिली आहे : ओवेसी

पंतप्रधान मोदींनी 'मेहरम'बाबत घोषणा केल्यानंतर ओवेसींनी त्यांच्यावर थेट निशाणा साधला. 'सौदी हज अथॉरिटीनं 45 वर्षाहून जास्त वय असलेल्या कोणत्याही मुस्लिम महिलेला महेरमशिवाय हज यात्रा जाण्याची अनुमती दिली आहे. त्यामुळे जे काम परदेशी सरकारनं केलं आहे त्याचं श्रेय पंतप्रधान मोदींनी घेता कामा नये.' असं ओवेसी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी नेमकी कोणती घोषणा केली होती?

“जर एखादी मुस्लीम महिला हज यात्रेला जाऊ इच्छित असेल, तर तिला मेहरम (एक पुरुष संरक्षक) शिवाय जाता येत नव्हते. याबाबत अधिक माहिती घेतल्यावर मला समजलं की, ही प्रथा सुरु करण्यामागे आम्हीच लोक आहोत. या प्रथेला कोणत्याही इस्लामिक देशात मान्यताच नाही.”

मोदी पुढे म्हणाले की, “अल्पसंख्याक मंत्रालयाने यावरील निर्बंध काढून टाकले आहेत. त्यामुळे कोणतीही मुस्लीम महिला पुरुष संरक्षकाशिवाय हज यात्रा सहज करु शकते. विशेष म्हणजे, आत्तापर्यंत 1300 महिलांनी विना मेहर हज यात्रा करण्यासाठी अर्ज केला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.”

काय आहे ‘मेहरम’?

‘मेहरम’ म्हणजे ज्या मुस्लीम महिलेचा विवाह झालेला नाही. ती महिला आपले वडील, सख्खा भाऊ यांच्याशिवाय हज यात्रेला जाऊ शकत नव्हती. त्यामुळे हज यात्रेसाठी मुस्लीम महिलेला ‘मेहरम’ अतिशय आवश्यक असायचा. अनेक उलेमा मुस्लीम महिलांना एकट्याने हज यात्रा करणे म्हणजे शरियतच्या विरोधी असल्याचं सांगतात.

दरम्यान, हज यात्रेसंदर्भातील नियमानुसार, वयाची 45 वर्ष पूर्ण केलेल्या महिलेला विना ‘मेहरम’ हज यात्रा करता येत होती. पण आता हिच प्रथा बंद केल्याने कोणत्याही वयोगटातील मुस्लीम महिलेला हज यात्रा करता येणार आहे.

संबंधित बातम्या :

तिहेरी तलाकनंतर हज यात्रेतील ‘मेहरम’ प्रथा बंद, मोदींची घोषणा

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Modi should not take credit for shutting down the Meheram said Owaisi latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV