गोरक्षक, चीन, अमरनाथ मुद्द्यावरुन संसदेचं पावसाळी अधिवेशन गाजणार

गोरक्षक, शेतकरी आंदोलन, काश्मीर तणाव आणि चीनचा हस्तक्षेप या मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.

By: | Last Updated: > Monday, 17 July 2017 7:54 AM
Monsoon session of parliament to start today; opposition to corner govt on china, amarnath attack-issue

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. गोरक्षक, शेतकरी आंदोलन, काश्मीर तणाव आणि चीनचा हस्तक्षेप या मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.

आजपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाची सांगता 11 ऑगस्टला करण्यात येणार आहे. आज सभागृह सुरु होताच निधन झालेल्या सदस्यांना श्रद्धांजली देण्यात येणार आहे आणि त्यानंतर सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात येईल.

देशातील कथित गोरक्षकांशी संबंधित घटना, अमरनाथ दहशतवादी हल्ल्यासह जम्मू काश्मीरमधील परिस्थिती, डोकलाममध्ये चीनची घुसखोरी, दार्जिलिंगमधील अशांतता अशा विविध मुद्द्यांवर काँग्रेस, डावे, तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्ष सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. तर सरकारनेही सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त करत 16 नवी विधेयकं सादर करण्याचं सांगितलं आहे.

या अधिवेशात आम्ही नियमांनुसारच सर्व मुद्द्यांवर सभागृहात चर्चा करण्यासाठी तयार आहोत. यादरम्यान अनेक महत्त्वाची विधेयकं सादर केली जातील, तर अनेक विधेयक चर्चेनंतर मंजूर केली जातील. आम्हाला विश्वास आहे की, विरोधक सकारात्मक भूमिका निभावेल, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितलं.

दरम्यान, लोकसभा आणि राज्यसभेत 16 नवी विधेयकं सादर केली जातील, ज्यात जम्मू-कश्मीर जीएसटी विधेयक आणि नागरिकता दुरुस्ती विधेयकाचा समावेश आहे.

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Monsoon session of parliament to start today; opposition to corner govt on china, amarnath attack-issue
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

काँग्रेसच्या चाणक्याला हरवण्यासाठी भाजपचा सापळा
काँग्रेसच्या चाणक्याला हरवण्यासाठी भाजपचा सापळा

नवी दिल्ली: बिहारमध्ये लालू-नितीश यांच्या युतीला सुरुंग

हुंडाबळी प्रकरणात शहानिशा केल्याशिवाय अटक नाही : सुप्रीम कोर्ट
हुंडाबळी प्रकरणात शहानिशा केल्याशिवाय अटक नाही : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : हुंडाविरोधी तक्रारीसंदर्भात सुप्रीम कोर्टानं अत्यंत

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून बहुमत सिद्ध!
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून बहुमत सिद्ध!

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव

गुजरातमध्ये काँग्रेसला भगदाड, तीन आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश
गुजरातमध्ये काँग्रेसला भगदाड, तीन आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : गुजरातमध्ये काँग्रेसला भगदाड पडले आहे. बलवंत सिंह

अहमदाबादमध्ये ‘कोसळधार’, विमानतळावर पाणीच पाणी!
अहमदाबादमध्ये ‘कोसळधार’, विमानतळावर पाणीच पाणी!

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये गेल्या काही तासांपासून

व्हिडिओ : पासपोर्टसाठी अर्ज करण्याच्या सोप्या टिप्स
व्हिडिओ : पासपोर्टसाठी अर्ज करण्याच्या सोप्या टिप्स

पासपोर्टसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भराल? पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्या

लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, जेडीयूला शिवसेनेपेक्षा जास्त मंत्रिपदं?
लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, जेडीयूला शिवसेनेपेक्षा...

नवी दिल्ली : बिहारमधील राजकीय भूकंपाने देशाच्या राजकारणालाही

केजरीवाल माझ्याशी खोटं बोलले, मी त्यांची केस लढणार नाही: जेठमलानी
केजरीवाल माझ्याशी खोटं बोलले, मी त्यांची केस लढणार नाही: जेठमलानी

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत

LIVE - नितीश कुमार यांचा शपथविधी
LIVE - नितीश कुमार यांचा शपथविधी

पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल (बुधवार) राजीनामा

तेजस्वी यादवांचा रात्री अडीच वाजता राजभवनावर मोर्चा
तेजस्वी यादवांचा रात्री अडीच वाजता राजभवनावर मोर्चा

पाटणा : मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल (बुधवार) मुख्यमंत्रीपदाचा