ना जीन्स, ना लेंगा, ना पायजमा! लुंगी भारतात सर्वात फेमस

एक लाख नागरिकांसोबत केलेल्या सर्व्हेत 52 टक्के जणांनी गेल्या वर्षभरात एक लुंगी विकत घेतल्याचं सांगितलं.

ना जीन्स, ना लेंगा, ना पायजमा! लुंगी भारतात सर्वात फेमस

नवी दिल्ली : जीन्स-टी शर्ट नाही, सदरा-लेंगा नाही, तर लुंगीला भारतातील सर्वाधिक पुरुषांशी पसंती दिली आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने 2011-12 ची आकडेवारी जारी केली आहे.

भारतीय पुरुष लुंगीला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर धोतर आणि कुर्ता-पायजम्याचा क्रमांक लागतो.
एक लाख नागरिकांसोबत केलेल्या सर्व्हेत 52 टक्के जणांनी गेल्या वर्षभरात एक लुंगी विकत घेतल्याचं सांगितलं. तर 21 टक्के जणांनी धोतर तर 13 टक्के लोकांनी पायजमा खरेदी केल्याचं सांगितलं.

लुंगी आणि धोतर हा पेहराव प्रामुख्याने भारतात दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये केला जातो. उत्तरेकडील राज्यांनी कुर्ता आणि पायजमा या पेहरावाला पसंती दिली.

लुंगी परिधान करणाऱ्या राज्यांमध्ये ओदिशाचा पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, तामिळनाडू यांचा नंबर लागतो. कुर्ता-पायजमा घालणाऱ्यांमध्ये हरियाणा-दिल्ली ही राज्यं अव्वल आहेत.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Most popular traditional attire among Indian men is Lungi : Survey latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV