शाळेत ‘येस सर’ ऐवजी ‘जय हिंद’ बोला!, मध्य प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांच्या अजब फतवा

मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री विजय शाह यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना हजेरीवेळी 'येस सर' किंवा 'येस मॅडम' ऐवजी 'जय हिंद' बोलणे बंधनकारक असणार असल्याचं सांगितलं आहे.

By: | Last Updated: > Wednesday, 13 September 2017 2:22 PM
mp education ministr vijay shah directed satna all schools to ensure students answer roll call jai hind

फोटो सौजन्य : एएनआय

भोपाळ : शाळेतील विद्यार्थ्यांची हजेरी घेताना नेहमी विद्यार्थी ‘येस सर’ किंवा ‘येस मॅडम’ म्हणतात. पण मध्य प्रदेशच्या शिक्षण मंत्री विजय शाह यांनी अजब फतवा लागू करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पण आता शाळेत हजेरीवेळी विद्यार्थ्यांना ‘येस सर’ नव्हे, तर ‘जय हिंद’ बोलणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

शिक्षण मंत्री विजय शाह म्हणाले की, “आता शाळेतील विद्यार्थ्यांना हजेरीवेळी ‘येस सर’ किंवा ‘येस मॅडम’ ऐवजी ‘जय हिंद’ बोलणे बंधनकारक असणार आहे. सरकारी शाळांसोबतच खासगी शाळांमधूनही हा नियम बंधनकारक असून, याची अंमलबजावणी 1 ऑक्टोंबरपासून करण्यात येणार आहे.”

 

 

दोन दिवसांच्या चित्रकूट दौऱ्यावरुन सटणामध्ये दाखल झाल्यानंतर, पत्रकारांशी बोलाताना त्यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. असे करण्यामागे विद्यार्थी दशेतच मुलांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी यासाठी हे करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

या निर्णयाची सटण्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर, संपूर्ण राज्यात हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:mp education ministr vijay shah directed satna all schools to ensure students answer roll call jai hind
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

संघाकडे एके-47 सारखी शस्त्रं येतात कुठून? : प्रकाश आंबेडकर
संघाकडे एके-47 सारखी शस्त्रं येतात कुठून? : प्रकाश आंबेडकर

नवी दिल्ली  : ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कुठल्याच कायद्यांतर्गत

बर्थडे स्पेशल: मनमोहन सिंह यांचे 5 निर्णय देश विसरु शकणार नाही!
बर्थडे स्पेशल: मनमोहन सिंह यांचे 5 निर्णय देश विसरु शकणार नाही!

नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा आज वाढदिवस.

राणे-शाहांच्या बैठकीत नेमकं काय काय झालं?
राणे-शाहांच्या बैठकीत नेमकं काय काय झालं?

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या दिवशीच

तासाभराने सेल्फी पाहताना समजलं मित्र पाण्यात बुडाला!
तासाभराने सेल्फी पाहताना समजलं मित्र पाण्यात बुडाला!

बंगळुरु : सेल्फीचा नाद एखाद्याच्या जीवावर बेतल्याची अनेक उदाहरणं

हनीप्रीत दिल्लीतच लपल्याची माहिती, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
हनीप्रीत दिल्लीतच लपल्याची माहिती, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

नवी दिल्ली : बाबा राम रहीमची निकटवर्तीय मानली जाणारी हनीप्रीत

पंतप्रधान मोदींकडून आदित्य ठाकरेंचं जाहीर कौतुक
पंतप्रधान मोदींकडून आदित्य ठाकरेंचं जाहीर कौतुक

मुंबई: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवासेना प्रमुख आदित्य

'पतंजली'च्या आचार्य बालकृष्णांची संपत्ती 70 हजार कोटी!
'पतंजली'च्या आचार्य बालकृष्णांची संपत्ती 70 हजार कोटी!

मुंबई : बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’चे प्रमुख आचार्य

SBI खातेधारकांच्या मिनिमम बॅलन्सच्या मर्यादा शिथिल
SBI खातेधारकांच्या मिनिमम बॅलन्सच्या मर्यादा शिथिल

मुंबई : ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’नं मिनिमम बॅलन्स ठेवण्याच्या अटी

यापुढे घुसखोरी केल्यास जमिनीत गाडू, भारतीय लष्करप्रमुखांचा दहशतवाद्यांना इशारा
यापुढे घुसखोरी केल्यास जमिनीत गाडू, भारतीय लष्करप्रमुखांचा...

नवी दिल्ली : सीमा ओलांडून भारतात आलात, तर जमिनीत गाडू, असा सज्जड दम

अमित शाहांची राहुल गांधींवर जोरदार टीका
अमित शाहांची राहुल गांधींवर जोरदार टीका

मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत बोलताना भाजप