महाराष्ट्र, गुजरातनंतर मध्य प्रदेशातही पेट्रोल, डिझेल स्वस्त

महाराष्ट्र आणि गुजरातनंतर आता मध्य प्रदेश सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

By: | Last Updated: > Friday, 13 October 2017 12:18 PM
MP government Reduce 3 percent VAT on petrol diesel

भोपाळ : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतीपासून दिलासा देण्यासाठी सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातनंतर आता मध्य प्रदेश सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलवरील 3 टक्के आणि डिझेलवरील 5 टक्के व्हॅट एमपी सरकारने कमी केला आहे.

राज्यातही पेट्रोल आणि डिझेल स्वस्त

केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे. पेट्रोल 2, तर डिझेल 1 रुपयांनी स्वस्त झालं आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

केंद्र सरकारचं आवाहन

देशात पेट्रोलचे दर 80 रुपये प्रती लिटरच्या पुढे गेल्यानंतर सरकारवर चौफेर टीका झाली. या टीकेनंतर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी 2 रुपयांनी कमी केली. त्यानंतर केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहून व्हॅट कमी करण्याचं आवाहन केलं होतं.

गुजरातमध्ये पेट्रोल-डिझेल जवळपास 3 रुपयांनी स्वस्त!

केंद्र सरकारच्या सूचनेनंतर महाराष्ट्रापाठोपाठ गुजरात सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात केली. गुजरात सरकारने व्हॅटमध्ये 4 टक्क्यांनी कपात केल्यामुळे पेट्रोल 2.93 रुपये, तर डिझेल 2.72 रुपयांनी स्वस्त झालं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी याबाबत घोषणा केली.

हिमाचल प्रदेश सरकारनेही व्हॅट घटवला

हिमाचल प्रदेश सरकारनेही मंत्रिमंडळ बैठकीनंतर व्हॅटमध्ये एका टक्क्याने कपात केली. मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी याबाबत माहिती दिली.

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:MP government Reduce 3 percent VAT on petrol diesel
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

वाढत्या प्रदुषणामुळं 25 लाख भारतीयांचा मृत्यू!
वाढत्या प्रदुषणामुळं 25 लाख भारतीयांचा मृत्यू!

नवी दिल्ली : संपूर्ण देशात 2015 मध्ये जल, वायू आणि इतर प्रकारच्य़ा

देशाचे सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांचा राजीनामा
देशाचे सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांचा राजीनामा

नवी दिल्ली : देशाचे सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांनी आपल्या पदाचा

‘दाऊदच्या संपत्तीच्या लिलावात त्याच्याच हस्तकांची घुसखोरी’
‘दाऊदच्या संपत्तीच्या लिलावात त्याच्याच हस्तकांची घुसखोरी’

मुंबई : भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिम भोवतीचा फास घट्ट

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017

1. राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तीव्र, धुळ्यात अर्धनग्न

पंतप्रधान मोदी लष्करी गणवेशात, जवानांसोबत दिवाळी साजरी
पंतप्रधान मोदी लष्करी गणवेशात, जवानांसोबत दिवाळी साजरी

जम्मू काश्मीर : पंतप्रधान झाल्यापासून सीमेवर दिवाळी साजरी

फेसबुकवर मैत्री, नंतर महिलेचा IAS अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप
फेसबुकवर मैत्री, नंतर महिलेचा IAS अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप

कोलकाता : मुंबईत राहणाऱ्या महिलेने एका आयएएस अधिकाऱ्याविरोधात

हरियाणात 22 वर्षीय गायिकेची गोळ्या झाडून हत्या
हरियाणात 22 वर्षीय गायिकेची गोळ्या झाडून हत्या

पानिपत : हरियाणातील पानिपतमध्ये 22 वर्षीय गायिकेची गोळ्या झाडून

सोशल मीडियावर फोटो अपलोड करणं अनैतिक : दारुल उलूम देवबंद
सोशल मीडियावर फोटो अपलोड करणं अनैतिक : दारुल उलूम देवबंद

  सहारनपूर (उत्तर प्रदेश) : मुस्लिम पुरुष आणि महिलांनी सोशल

जीएसटी, नोटाबंदीमुळं कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिवाळी गिफ्ट्सला कात्री
जीएसटी, नोटाबंदीमुळं कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिवाळी गिफ्ट्सला...

मुंबई : दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या गिफ्टमध्ये

माफ करा, मी नोटाबंदीचं समर्थन केलं होतं : कमल हसन
माफ करा, मी नोटाबंदीचं समर्थन केलं होतं : कमल हसन

तामिळनाडू : मोदी सरकारच्या नोटाबंदीची स्तुती करणाऱ्या अभिनेता कमल