'पद्मावत' सिनेमा निरर्थक, अजिबात पाहू नका : ओवेसी

'पद्मावत हा सिनेमा निरर्थक आहे. तुम्ही सिनेमा पाहून तुमचा वेळ आणि पैसा वाया घालवू नका.'

'पद्मावत' सिनेमा निरर्थक, अजिबात पाहू नका : ओवेसी

वारंगल (तेलंगणा) : संजय लीला भन्साली यांच्या 'पद्मावत' या सिनेमाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु असून आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी देखील या वादात उडी घेतली आहे. 'पद्मावत' हा सिनेमा निरर्थक असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. तसंच मुसलमानांनी हा सिनेमा पाहू नये असंही ते यावेळी म्हणाले.

तेलंगणामध्ये एका सभेला संबोधित करताना ओवेसी म्हणाले की, 'पद्मावत हा सिनेमा निरर्थक आहे. तुम्ही सिनेमा पाहून तुमचा वेळ आणि पैसा वाया घालवू नका.'

दरम्यान, पद्मावत सिनेमाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरुच आहे. चार राज्यातील पद्मावतीच्या बंदीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे देशभरातील सर्व राज्यात 'पद्मावत' प्रदर्शित होणार आहे.

सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीनंतरही राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि हरियाणा या भाजपशासित राज्यांमध्ये 'पद्मावत'च्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. या विरोधात सिनेमाच्या निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

दरम्यान, येत्या 25 जानेवारी रोजी 'पद्मावत' सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात दीपिका पादूकोण, रणवीर सिंह आणि शाहीद कपूर मुख्य भूमिकेत आहेत. संजय लीला भन्साळी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

सिनेमाला वाढता विरोध लक्षात घेऊन, ‘पद्मावती’ सिनेमाचं नाव बदलून ‘पद्मावत’ करण्यात आले. त्याचसोबत, सेन्सॉर बोर्डाच्या सूचनांनुसार काही बदलही करण्यात आले. मात्र तरीही सिनेमाला होणारा विरोध कमी झालेला नाही.

संबंधित बातम्या

'पद्मावत'च्या निर्मात्यांना दिलासा, सर्व राज्यात प्रदर्शित होणार!
चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’वर बंदी, निर्माते सुप्रीम कोर्टात

केजीतील विद्यार्थ्याचा घूमर डान्स, करणी सेनेकडून शाळेत तोडफोड

‘पद्मावत’ची अधिकृत रिलीज डेट अखेर जाहीर

अखेर मोठ्या वादानंतर ‘पद्मावत’ सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज

'घूमर'मध्ये दीपिकाची कंबर दिसणार नाही, बोर्डाच्या सूचनेनंतर बदल

'पद्मावत'मध्ये 300 कट्स नाहीत, प्रसून जोशींकडून वृत्ताचा इन्कार 

पद्मावती'चं नाव बदलण्याची शक्यता, नवं नाव...

म्हणून 'पद्मावती'चं नाव 'पद्मावत' करण्याची सूचना : प्रसून जोशी

'पद्मावती'चं भविष्य इतिहासतज्ज्ञांच्या हाती, मार्चमध्ये रिलीज?

आधी 'पद्मावती' चित्रपट बघा, मग बोला, शाहीदचा संताप

‘पद्मावती’चं प्रदर्शन रोखण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

‘पद्मावती’ सिनेमाच्या वादाचा चेंडू संसदीय बोर्डाच्या कोर्टात

‘पद्मावती’ चित्रपटाचं रीलिज लांबणीवर, निर्मात्यांची घोषणा

‘पद्मावती’चा विरोध तीव्र, भन्साळींच्या घरासमोर आंदोलन

… तर पद्मावती रिलीज होऊ देणार नाही, यूपीचे उपमुख्यमंत्रीही विरोधात

‘पद्मावती’च्या मीडिया स्क्रीनिंगवरुन सेन्सॉर बोर्ड नाराज

सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावती’ सिनेमाची कॉपी परत पाठवली

‘पद्मावती’पेक्षा राजस्थानातील महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या : शशी थरुर

एक दिल.. एक जान.. ‘पद्मावती’तील प्रेम-विरह गीत रीलिज

दीपिकाचा जबरदस्त लूक, ‘पद्मावती’चं नवं पोस्टर रिलीज

रणवीरच्या खिल्जीमुळे दीपिका अस्वस्थ, ब्रेकअपची चर्चा

रिलीजआधी ‘पद्मावती’चा विक्रम; ‘बाहुबली’, ‘दंगल’ला मागे टाकलंभारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Muslims should not watch ‘Padmavat’ cinema says asaduddin owaisi latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV