ज्यांच्या भरोशावर ट्वीट, त्यांनीच राहुल गांधींना तोंडघशी पाडलं

वर्षभरानंतर आपण आनंदी असल्याचा दावा नंदलाल यांनी केला. लागलीच अमित शाह यांनी राहुल गांधींना ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलं.

ज्यांच्या भरोशावर ट्वीट, त्यांनीच राहुल गांधींना तोंडघशी पाडलं

नवी दिल्ली : हरियाणाच्या गुरुग्राममध्ये राहणारे 80 वर्षाचे निवृत्त सैनिक नंदलाल यांची सकाळपासूनच देशभर चर्चा सुरु आहे. नंदलाल यांच्या फोटोमुळे काँग्रेसचे युवराज राहुल गांधी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात ट्विटरयुद्ध सुरू झालं. मात्र हे ट्वीटच राहुल गांधींवर उलटलं आहे.

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त राहुल गांधी यांनी नंदलाल यांचा फोटो शेअर करुन नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागलं.  8 नोव्हेंबर... नोटाबंदीनंतर बँकेच्या रांगाबाहेर उभ्या असलेल्या नंदलाल यांचा रडणारा चेहरा ट्वीट करताना राहुल गांधी म्हणतात...

"एक आँसू भी हुकूमत के लिए ख़तरा है
तुमने देखा नहीं आँखों का समुंदर होना"

https://twitter.com/OfficeOfRG/status/928090550636384256
एक आँसू भी हुकूमत के लिए ख़तरा है..., राहुल गांधींची मोदींवर टीका

अर्थात राहुल गांधींच्या या ट्वीटला नंदलाल यांनी वर्षभरापूर्वी नोटाबंदीवर केलेल्या तक्रारीची पार्श्वभूमी होती.
राहुल गांधींच्या ट्वीटवर कौतुकाचा पाऊस सुरु होत नाही तोच नंदलाल यांनीच त्यांची फजिती केली.

https://twitter.com/ANI/status/928179965362716673

ज्यांच्या जीवावर राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता, त्याच नंदलाल यांनी राहुल गांधींना तोंडघशी पाडलं. वर्षभरानंतर आपण आनंदी असल्याचा दावा नंदलाल यांनी केला. असं झाल्यावर भाजपचे नेते गप्प कसे बसतील. लागलीच अमित शाह यांनी राहुल गांधींना ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलं.

ताउम्र ग़रीबों की झूठी तस्वीरों से गुमराह कर सत्ता हतियाते रहे
झूठे आँसू, झूठी तस्वीरों के पीछे से देश को छलना अब और मुमकिन नहीं
असली चहरा कोंग्रेस का बेनक़ाब हुआ, अब नये भारत का आग़ाज़ हुआ।

https://twitter.com/AmitShah/status/928191232915922944
नोटाबंदीवरुन काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये तू-तू मैं मैं सुरु आहे आणि या राजकारणाला जनता देखील कंटाळली आहे. मात्र नोटाबंदी, नंदलाल आणि ट्विटरयुद्ध यामुळे जनतेला दोन चांगले शेर वाचायला मिळाले तेवढीच काय ती जमेची बाब

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Nand Lal, who appeared in iconic demonetization picture praises the Government latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV