शिंजो आबे यांच्यासाठी डिनरला गुजराती-जपानी पक्वान्नं

शिंजो आबे आणि त्यांच्या पत्नी आकी आबे यांच्यासाठी आयोजित डिनरसाठी उंधीयू, भेंडी करी यासारखी गुजराती आणि जपानी पक्वान्नं करण्यात आली आहेत.

शिंजो आबे यांच्यासाठी डिनरला गुजराती-जपानी पक्वान्नं

अहमदाबाद : जपानचे पंतप्रधान शिंजो आबे सपत्नीक भारत भेटीवर आले आहेत. अहमदाबादमध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमीपूजन करण्यात येणार आहे. आबे यांच्या डिनरसाठी खास गुजराती आणि जपानी पक्वान्नं करण्यात आली आहेत.

डिनर मेन्यू काय ?

पपईचं सॅलड
शेंगदाणा, काकडी, मका यांचं सॅलड

गुजराती थाळी :

पालक जामुन
रस्सावाला बटाटा
भरलेलं पडवळ
उंधियू
भेंडीची करी
गुजराती डाळ
खिचडी
पुलाव
पुरी, रोटी
बाजरी ठेपला

जपानी पक्वान्न :

काटसू करी
जिंजर सोया तोफू
वांग्याचं आकामिसो
मिसो याकी उदोन

मिठाई :

केसर जिलबी
आंबा/अंजीर/केसर पिस्ता आईस्क्रिम
पेटिट फोर्स
चहा-कॉफी

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांना विमानतळावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून आबे आणि त्यांच्या पत्नीचं पारंपरिक नृत्याने स्वागत करण्यात आलं.

अहमदाबादमध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि शिंजो आबे यांच्या रोड शोला सुरुवात झाली. विशेष म्हणजे या रोड शोदरम्यान आबे आणि त्यांच्या पत्नी भारतीय वेशभूषेत दिसले. आठ किमीच्या रोड शोदरम्यान जपानच्या पंतप्रधानांना भारतीय संस्कृतीची विविधता दाखवण्यात आली.

साबरमती आश्रमाजवळ या रोड शोचा शेवट झाला. तिथे नरेंद्र मोदी, शिंजो आबे आणि त्यांच्या पत्नी अाकी आबे यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.

गुरुवार 14 सप्टेंबर 2017

सकाळी 9.50 वा. – भारतातील पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद-मुंबईचं भूमीपूजन

सकाळी 11.30 वा.  – दांडी कुटिरला भेट

दुपारी 12 वा. – उच्चस्तरीय चर्चा

दुपारी 1. वा – दोन्ही देशात करार आणि पत्रकार परिषद, स्थळ- महात्मा मंदिर

दुपारी 2.30 वा – भारत-जपान बिझनेस लीडर ग्रुप फोटो

दुपारी 3.45 वा – महात्मा मंदिरातील कॉन्व्हेंन्शन हॉलमधील प्रदर्शनाला भेट

रात्री 9.35 वा. – शिंजो आबे टोकियोला रवाना होणार

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV