मोदींकडून रेणुका चौधरींची तुलना शूर्पणखेशी, काँग्रेसचा गोंधळ

मोदींनी आधार कार्ड संकल्पनेचं श्रेय तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणींना दिलं. तेव्हा काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी जोरात हसू लागल्या.

मोदींकडून रेणुका चौधरींची तुलना शूर्पणखेशी, काँग्रेसचा गोंधळ

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांच्या हास्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टिपण्णी केल्यानंतर आता काँग्रेस आक्रमक झालीय. नरेंद्र मोदींनी माफी मागावी, यासाठी काँग्रेसनं राज्यसभेत गोंधळ घातला. त्यामुळे राज्यसभेचं कामाकाज एका तासासाठी तहकूब करण्यात आलं.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाला राज्यसभेत काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं. त्यावेळी मोदींनी आधार कार्ड संकल्पनेचं श्रेय तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणींना दिलं. तेव्हा काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी जोरात हसू लागल्या.

सभापती व्यंकय्या नायडू यांनी चौधरींच्या हास्यावर नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी मोदींनी व्यंकय्या नायडूंना मध्येच थांबवलं. 'रेणुकाजींना काहीही बोलू नका, अशी माझी सभापतींना विनंती आहे. 'रामायण' मालिकेनंतर बऱ्याच वर्षांनी असं हास्य ऐकण्याचं भाग्य लाभलं' असा टोला मोदींनी लगावला. रेणुका चौधरी यांच्या हसण्याची तुलना शूर्पणखेच्या राक्षसी हास्याशी केली.

'15 लाखांच्या घोषणेचं काय झालं?', मोदींच्या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ


मोदींच्या वक्तव्यानंतर भाजपसह मित्रपक्षातील सर्व सदस्य जोरजोरात हसायला लागले आणि रेणुका चौधरींचं हास्य लोप पावलं. रेणुका चौधरी यावर काहीतरी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत होत्या, सभागृहातील सदस्यांच्या आवाजात त्यांचं बोलणं ऐकू आलं नाही.

'मंत्री किरेन रिजीजू यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ आक्षेपार्ह आहे. ही मंडळी बेटी बचाओ आणि महिलांच्या सन्मानाच्या मोठमोठ्या बाता करतात, सन्मान राखण्याचा त्यांचा हा मार्ग आहे का? मी दोन तरुण मुलींची आई आहे. मी कोणाची तरी पत्नी आहे आणि माझी तुलना शूर्पणखेच्या राक्षसी हास्याशी केली जाते. हे अत्यंत लज्जास्पद आहे.' या शब्दात रेणुका चौधरींनी संताप व्यक्त केला.

'पंतप्रधानांनी वैयक्तिक टीका केली आहे. अर्थात तुम्ही त्याशिवाय काय अपेक्षा करु शकता. मला यावर प्रतिक्रिया देऊन खालच्या स्तराला जायचं नाही. कुठल्याही महिलेबाबत असं वक्तव्य करणं निंदनीय आहे' असं चौधरी म्हणाल्या.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Narendra Modi compares Renuka Chaudhari with Suparnakha latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV