मोदींकडून इस्रायलमधील मराठी नियतकालिक 'मायबोली'चा उल्लेख

By: | Last Updated: > Thursday, 6 July 2017 7:57 AM
Narendra Modi praises Marathi periodic magazine Maayboli in Israel latest update

जेरुसलेम : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर आहेत. दुसऱ्या दिवशी कन्वेन्शन सेंटरमध्ये भारतीय समुदायाच्या नागरिकांना संबोधित करताना मोदींनी इस्रायलमध्ये प्रकाशित होणाऱ्या ‘मायबोली’ या मराठी नियतकालिकाचा उल्लेख केला.

‘इस्रायलमध्ये मायबोली या मराठी भाषेतील नियतकालिकाचं प्रकाशन होत असल्याचं ऐकून आनंद झाला.’ असं पंतप्रधान मोदी कौतुकाने म्हणाले. नोआ मोसिल हे मायबोलीचे संपादक आहेत. विशेष म्हणजे गेल्या 45 वर्षांपासून जेरुसलेममध्ये या अंकाचं नियमित प्रकाशन होतं. नोआ मोसिल हे मराठी भाषिक ज्यू आहेत. त्यांचा जन्म आणि शिक्षण महाडमधील तळा गावात झालं आहे.

जवळच्या मित्राला अनेक दिवसांनी भेटल्याची भावना : पंतप्रधान मोदी

‘कोच्चीमधून आलेले नागरिक इथे ओणमही उत्साहात साजरा करतात. भारतातून आलेल्या ज्यू नागरिकांनी इस्रायलच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इस्रायलच्या वाळवंटात हरितक्रांतीचा विचार पुढे आला तेव्हा भारतातून आलेल्या ज्यू नागरिकांनी दिवसरात्र घाम गाळला.’ असंही मोदी पुढे म्हणाले.

70 वर्षात पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान इस्रायल दौरा करत असून एका जवळच्या मित्राला अनेक दिवसांनी भेटल्याची भावना आपल्या मनात असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं.

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Narendra Modi praises Marathi periodic magazine Maayboli in Israel latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

आमदार रवी राणांचा दावा खरा ठरला, महाराष्ट्रातील 22 मतं फुटली!
आमदार रवी राणांचा दावा खरा ठरला, महाराष्ट्रातील 22 मतं फुटली!

नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीत महाराष्ट्रातील विरोधकांची मतं

शिमल्यात बस दरीत कोसळली, 28 जणांचा मृत्यू
शिमल्यात बस दरीत कोसळली, 28 जणांचा मृत्यू

शिमला (हिमाचल प्रदेश) : शिमल्यात एका भीषण अपघातात 28 जणांचा मृत्यू

रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती
रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती

नवी दिल्ली : देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांच्या

एकाच वेळी 21 बँकांचं विलीनीकरण, सरकार ऐतिहासिक निर्णयाच्या तयारीत
एकाच वेळी 21 बँकांचं विलीनीकरण, सरकार ऐतिहासिक निर्णयाच्या तयारीत

नवी दिल्ली : देशातील सरकारी बँकांची संख्या लवकरच 21 हून 11 किंवा 12 वर

भारताचे चौदावे राष्ट्रपती कोण? निकाल अवघ्या काही तासांवर
भारताचे चौदावे राष्ट्रपती कोण? निकाल अवघ्या काही तासांवर

नवी दिल्ली : रामनाथ कोविंद की मीरा कुमार, भारताचे चौदावे राष्ट्रपती

तिबेटच्या डोंगराळ भागात चीनकडून हजारो टन युद्धसामुग्रीची आयात
तिबेटच्या डोंगराळ भागात चीनकडून हजारो टन युद्धसामुग्रीची आयात

नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर तिबेटच्या डोंगराळ भागात चीनच्या

स्पेशल रिपोर्ट : पाकिस्तानने 'असं' अडकवलं कुलभूषण जाधवांना
स्पेशल रिपोर्ट : पाकिस्तानने 'असं' अडकवलं कुलभूषण जाधवांना

मुंबई : कुलभूषण जाधव… मराठमोळा माजी नौदल अधिकारी.. कुलभूषण सध्या

तो मदत मागत राहिला, पण बायको-मुलाने प्राण सोडले
तो मदत मागत राहिला, पण बायको-मुलाने प्राण सोडले

होशंगबाद (मध्य प्रदेश) : दुचाकी अपघातानंतर रस्त्याच्या मधोमध तो

विश्व हिंदू परिषदेकडून मनोहर पर्रिकरांच्या राजीनाम्याची मागणी
विश्व हिंदू परिषदेकडून मनोहर पर्रिकरांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर

मराठमोळ्या पोलीस आयुक्तांकडून तेलंगणातील नागरिकांसाठी नवी सुविधा
मराठमोळ्या पोलीस आयुक्तांकडून तेलंगणातील नागरिकांसाठी नवी सुविधा

रचकोंडा (तेलंगणा): तेलंगणातील रचकोंडा पोलिसांनी नागरिकांसाठी