2019 मध्येही पहिली पसंती मोदींनाच असेल : अमेरिकन तज्ज्ञ

2019 मध्येही पहिली पसंती मोदींनाच असेल : अमेरिकन तज्ज्ञ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भाजपने उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोठा विजय मिळवला. या विजयासाठी नरेंद्र मोदींना जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या विजयामुळे 2019 मधील लोकसभा निवडणुकीतही लोकांची पहिली पसंती त्यांनाच असेल, असा दावा अमेरिकेतील तज्ज्ञांनी केला आहे.

नरेंद्र मोदी, लोकांची पहिली पसंती
अमेरिकेच्या जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयाचे सहाय्यक प्राध्यपक अॅडम जीगफेल्ड यांच्यामते, "भारतात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत, 2014 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा फार अतंर नाही. हे निकाल त्या निकालांसारख अविश्वसनीय आहेत. भाजप उमेदवार विरोधी उमेदवारापेक्षा फार मोठ्या फरकाने जिंकले आहेत."

2019 मध्येही लोकांची पहिली पसंत नरेंद्र मोदीच असतील. मोदी पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता जास्त असल्याचं या विजयावरुन दिसतं, असं अमेरिकन इंटरप्राईज इन्स्टिट्यूटे सदानंद धुमे म्हणाले.

विरोधकांची एकजूट आवश्यक
मात्र इतर प्राध्यापक इरफान नूरुद्दीन म्हणाले की, भाजपला 2019 मध्ये बहुमत मिळणार नाही, पण युती करुन भाजप सत्तेत येईल. भाजपने या राज्यांमध्ये अतिशय विचारपूर्वक प्रचार केला आहे. पण 2019 मध्ये मोदींना पराभूत करण्यासाठी विरोधकांना एकजूट व्हावं लागेल.

सदानंद धुमे यांच्या मते, निवडणुकीच्या आधी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय लोकांना अतिशय आवडला. अडचणी येऊनही लोकांनी पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचं समर्थन केलं. या विजयानंतर पंतप्रधान मोदी त्यांच्या निर्णयात गती आणू शकतात, असं काही जाणकाराचं मत आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV