गुजरातमध्ये आचारसंहितेपूर्वी 12 दिवसांत मोदींच्या 12 घोषणा

जर हिमाचलच्या निवडणुकांची घोषणा 12 तारखेला झाली, तर गुजरातचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यास 13 दिवसांचा विलंब का केला, असा सवाल उपस्थित होत आहे.

गुजरातमध्ये आचारसंहितेपूर्वी 12 दिवसांत मोदींच्या 12 घोषणा

मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच बुधवार 25 ऑक्टोबरपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र त्यापूर्वीच गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 12 घोषणांचा पाऊस पाडला आहे.

गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे, तर मतमोजणी 18 डिसेंबर रोजी होणार आहे. हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांचं मतदान 9 नोव्हेंबरला होणार असून निकाल गुजरातसोबतच 18 डिसेंबरला लागणार आहेत. त्यामुळे जर हिमाचलच्या निवडणुकांची घोषणा 12 तारखेला झाली, तर गुजरातचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यास 13 दिवसांचा विलंब का केला, असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यानच्या काळात गुजरातमध्ये काही प्रकल्पांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुन घेतलं. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीचा कालावधी वापरण्यासाठी गुजरात निवडणुकांच्या तारखा जाहीर करणं लांबवल्याचा आरोप होत आहे.

गुजरात निवडणूक 2017 : तारखा जाहीर, दोन टप्प्यात मतदान


'गुजरात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यास उशीर करण्यामागे कुठलीही मिलीभगत नाही' असं उत्तर मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती यांनी दिलं. गुजरात सरकारने पूरग्रस्तांना मदत जाहीर केली. मात्र निवडणूक कार्यक्रम आधी जाहीर झाला असता, तर याची पुनर्रचना केली असती, असंही ज्योतींनी सांगितलं. 229 जणांचा जीव घेणारी ही अभूतपूर्व आपत्ती असल्याचं त्यांनी सुचवलं.

गुजरातमध्ये 12 दिवसात मोदींच्या 12 घोषणा

1. ठिबक सिंचन वापरणाऱ्या शेतकऱ्यांना जीएसटीतून दिलासा
2. अधिकृत वैद्यकीय कार्यकर्त्यांना 50 टक्के वेतनवाढ
3. वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार पालिका कर्मचारी आणि शिक्षकांना पगारवाढ
4. मोफत वैद्यकीय उपचारांसाठी पात्र ठरण्याच्या मर्यादेत वाढ
5. शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज
6. पाटीदार आरक्षण आंदोलक आणि सानंद शेतकऱ्यांवरील केस मागे
7. सफाई कर्मचाऱ्यांना कायमचं अपंगत्व किंवा मृत्यू आल्यास कुटुंबीयांना नोकरी
8. सहाय्यक इलेक्ट्रिशियन्सना वेतनवाढ
9. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि निश्चित वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम भत्ता
10. खाजगी तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना टोलमाफी
11. दहा वर्षांची सेवा दिलेल्या शिक्षकांना नियमित केलं
12. अहमदाबाद मेट्रोची फेज 1 2020 पूर्वी पूर्ण होणार नसतानाही दुसऱ्या फेजसाठी फंडिंग

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Narendra Modi’s 12 announcements in Gujrat before model code of conduct latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV