प्रिया वारियरने इंस्टाग्रामवर झुकरबर्गलाही मागे टाकलं

नॅशनल क्रश ठरलेल्या दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया वारियरने आणखी एक नवा विक्रम केला आहे. सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या इंस्टाग्रामवर तिने 45 लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गलाही प्रियाने मागे टाकलं आहे.

प्रिया वारियरने इंस्टाग्रामवर झुकरबर्गलाही मागे टाकलं

मुंबई : नॅशनल क्रश ठरलेल्या दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया वारियरने आणखी एक नवा विक्रम केला आहे. सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या इंस्टाग्रामवर तिने 45 लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गलाही प्रियाने मागे टाकलं आहे.

मागच्याच आठवड्यात प्रियाचा ओरु अदार लव्ह सिनेमातील गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेण्ड झाला होता. काही वेळामध्येच नॅशनल क्रश बनलेल्या प्रियाच्या या गाण्याच्या व्हिडीओला यूट्यूबवरही विक्रमी व्ह्यूज मिळाले होते. आपल्या आकर्षक अदाकारीनं करोडो तरुणांच्या गळ्यातील ताईतही बवली.

आता फेसबुक आणि इंस्टाग्रामचा संस्थापक आणि सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गला मागे टाकत प्रियाने इंस्टावर 45 लाखांचा टप्पा पार केला आहे. मार्क झुकरबर्गला 40 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.

EXCLUSIVE : नॅशनल क्रश प्रिया प्रकाश वारियरशी मनमोकळ्या गप्पा 

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: national crush priya varrier got followers more than mark zukerberg latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV