भोंदू बाबांची यादी जारी करणाऱ्या आखाडा परिषदेचे महंत मोहनदास बेपत्ता!

आखाडा परिषदेने देशभरातील भोंदू बाबांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर हा प्रकार घडल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

भोंदू बाबांची यादी जारी करणाऱ्या आखाडा परिषदेचे महंत मोहनदास बेपत्ता!

लखनऊ: अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते महंत मोहनदास बेपत्ता झाले आहेत. महंत मोहन दास हे हरिद्वारहून मुंबईकडे जाताना रेल्वेतून बेपत्ता झाल्याचं सांगण्यात येत आहे.

महत्त्वाचं म्हणजे नुकतंच आखाडा परिषदेने देशभरातील भोंदू बाबांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर हा प्रकार घडल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

अलाहाबादमध्ये बैठकीनंतर आखाडा परिषदेने 14 भोंदू बाबांची यादी जारी केली होती. त्यानंतर आखाडा परिषदेला अनेक धमक्या येत होत्या.  त्या धमक्यांनंतर महंत मोहनदास बेपत्ता झाले आहेत.

दरम्यान, महंत मोहनदास बेपत्ता झाल्याचं तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे.

काल रात्री आठ वाजता भोपाल स्टेशनवर महंत मोहनदास यांचा एक शिष्य जेवण घेऊन आला होता, त्यावेळी मोहनदास बेपत्ता झाल्याचं लक्षात आलं. त्याच शिष्याने महंत गायब झाल्याची माहिती आखाड्याला दिली.

या प्रकारानं आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी म्हणाले, “आम्ही भोंदू बाबांची यादी जारी केल्यानंतर आम्हाला धमक्या येत होत्या. आता साधू-संतही सुरक्षित नाहीत, संतांच्या सुरक्षेत वाढ करावी”

संबंधित बातमी

आखाडा परिषदेकडून देशभरातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर 
भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV