गुजरातमधील राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराला अटक

पोरबंदर जिल्ह्यात दंगलीचा आणि पोलिसांना मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

गुजरातमधील राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराला अटक

गांधीनगर : गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव नवनिर्वाचित आमदार कांधल जाडेजा यांना अटक करण्यात आली आहे. पोरबंदर जिल्ह्यात दंगलीचा आणि पोलिसांना मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले आहेत.

कांधल जाडेजा यांचे भाऊ करण आणि कना यांच्यासह जवळपास बारा जणांनी रानावाव पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी सकाळी राडा केला. पोलीस स्टेशनमध्ये जबरदस्तीने प्रवेश करत त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी सामत गोगान यांना बेदम मारहाण केली. शिवाय मध्ये येणाऱ्या पोलिसांनाही मारलं.

जाडेजा यांचा विरोध असताना सामत गोगान यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरला होता. मात्र त्यांनी नंतर तो अर्ज मागेही घेतला. पण हे प्रकरण इथेच मिटलं नाही. जाडेजा यांच्या लोकांनी सामत यांचा शोध घेतला आणि पोलीस स्टेशनमध्ये घुसून त्यांना मारहाण केली.

कांधल जाडेजा आणि त्यांच्या भावांवर पोलीस स्टेशनमध्ये बेकायदेशीरपणे जमाव जमा करणं, दंगल, जाणीवपूर्वक अपमान करणं, नुकसान पोहोचवणं आणि सरकारी अधिकाऱ्याला कर्तव्यावर असताना रोखणं आणि मारहाण करणं अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांधल जाडेजा कोण आहेत?

कांधल हे गुन्हेगारी विश्वात 'गॉडमदर' म्हणून ओळख असणाऱ्या संतोकबेन जाडेजाचे पुत्र आहेत. कांधल जाडेजा यांनी भाजपच्या लखमन ओडेदरा यांचा 23 हजार 709 मतांनी पराभव केला, तर काँग्रेसचे वेजाभाई मोडेदरा हे तिसऱ्या स्थानावर राहिले. कांधल हे कुटियानातूनच मागच्या वेळीही आमदार होते. त्यामुळे या विजयाने त्यांनी एकप्रकारे आपली जागा कायम राखण्यात यश मिळवले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातमध्ये एकूण 72 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी केवळ पोरबंदर जिल्ह्यातील कुटियाना मतदारसंघातील जागा जिंकता आली. याआधीही राष्ट्रवादीने दोनवेळा गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. 2007 साली पहिल्याच वेळी 3 आमदार, 2012 साली 2 आमदार विजयी झाले होते आणि आता म्हणजे 2017 साली 1 आमदार निवडून आला आहे.

गांधींच्या पोरबंदरमध्ये 'गॉडमदर'चा मुलगा विजयी

कांधल जाडेजा यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते चर्चेत राहिले. त्याला दोन महत्त्वाची कारणं आहेत, एक म्हणजे, महात्मा गांधींचा वारसा ज्या जिल्ह्याला लाभला आहे, त्या पोरबंदर जिल्ह्यातील कुटियाना मतदारसंघातून कांधल उभे होते आणि दुसरं कारण म्हणजे, कांधल हे गुन्हेगारी विश्वातील 'गॉडमदर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतोकबेन जाडेजाचे पुत्र आहेत. आता राष्ट्रवादीच्या तिकिटावर कांधल विजयी झाले असल्याने ते कुटियानाचं पुन्हा एकदा नेतृत्त्व करणार आहेत. ते याच मतदारसंघातून राष्ट्रवादीचेच आमदार होते.

संबंधित बातमी : राष्ट्रपित्याच्या पोरबंदरमधून 'गॉडमदर'चा मुलगा आमदार

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: NCP MLA in Gujarat Kandhal Jadeja arrested for alleged rioting and thrashing police official in #Porbandar
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV