गेल्या 39 वर्षांपैकी 32 वर्ष काँग्रेसवर नेहरु-गांधी घराण्याचं राज्य

1978 पासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाकडे पाहिलं तर नेहरु-गांधी घराण्याचंच राज्य दिसतं. गेल्या 39 वर्षांपैकी 32 वर्षांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेहरु-गांधी घराण्यातील सदस्य आहे.

गेल्या 39 वर्षांपैकी 32 वर्ष काँग्रेसवर नेहरु-गांधी घराण्याचं राज्य

नवी दिल्ली : अखेर राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी याबाबतची घोषणा केली.

राहुल गांधी यांच्याविरोधात कुणीही अर्ज भरला नव्हता. त्यामुळे 132 वर्ष जुन्या असलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची  बिनविरोध निवड झाली.

या निवडीमुळे देशातील 100 वर्षांपेक्षा जास्त जुन्या असलेल्या पक्षाची धुरा पुन्हा एकदा नेहरु-गांधी घराण्यातील सदस्याच्याच खांद्यावर देण्यात आली आहे. नेहरु-गांधी कुटुंबाने काँग्रेसला आतापर्यंत पाच अध्यक्ष दिले आहेत. राहुल गांधी हे सहावे अध्यक्ष ठरले आहेत.

मोतीलाल नेहरु 1919 साली पक्षाचे अध्यक्ष

नेहरु-गांधी कुटुंबातून सर्वात अगोदर मोतीलाल नेहरु 1919 साली पक्षाचे अध्यक्ष बनले. त्यानंतर मोतीलाल नेहरु यांचे चिरंजीव आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्याकडे 1929 साली ही धुरा देण्यात आली. तिसऱ्या पिढीत 1959 साली दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पहिल्यांदा पक्षाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर 1974 ते 1984 या काळात त्यांनी पक्षाध्यक्ष म्हणून काम पाहिलं. चौथ्या पिढीत राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसचं अध्यक्षपद देण्यात आलं.

1998 साली सोनिया गांधींची निवड

राजीव गांधी यांनी इंदिरा गांधी यांच्यानंतर पक्षाची सर्व सूत्र सांभाळली. 1991 साली राजीव गांधी यांची एका रॅलीदरम्यान हत्या करण्यात आली. राजीव गांधी यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सलग सात वर्षे नरसिंह राव आणि सीताराम केसरी यांच्याकडून 1998 साली पुन्हा एकदा नेहरु-गांधी कुटुंबातील सदस्याकडे आली. सोनिया गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

सोनिया गांधी 19 वर्षांपासून पक्षाध्यक्ष

नेहरु-गांधी कुटुंबात पक्षाध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांनी सर्वात जास्त काळ कामकाज पाहिलं आहे. त्यांच्यानंतर आता राहुल गांधी यांच्या हातात पक्षाची धुरा देण्यात आली आहे.

नेहरु-गांधी कुटुंबाचं पक्षावर वर्चस्व

1978 पासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाकडे पाहिलं तर नेहरु-गांधी घराण्याचंच राज्य दिसतं. गेल्या 39 वर्षांपैकी 32 वर्षांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेहरु-गांधी घराण्यातील सदस्य आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Nehru Gandhi family member is head of Congress from last 32 years out of 39
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV