पासपोर्टच्या नियमात 5 दिलासादायक बदल, धावपळ कमी होणार!

आई-वडिलांची माहिती, जन्म प्रमाणपत्र, विवाहित किंवा घटस्फोटितांसाठीच्या नियांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

पासपोर्टच्या नियमात 5 दिलासादायक बदल, धावपळ कमी होणार!

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट काढण्याच्या नियमांमध्ये काही दिलासादायक बदल केले आहेत. त्यामुळे कागदपत्रांमुळे ज्यांचा पासपोर्ट काढणं बाकी आहे, त्यांना दिलासा मिळू शकतो. आई-वडिलांची माहिती, जन्म प्रमाणपत्र, विवाहित किंवा घटस्फोटितांसाठीच्या नियांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

जन्म प्रमाणपत्र

ज्यांचा जन्म 26 जानेवारी 1989 किंवा त्यानंतर झाला, त्यांच्यासाठी जुन्या नियमांनुसार जन्माचं प्रमाणपत्र देणं अनिवार्य होतं. मात्र नव्या नियमांनुसार यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता कोणतीही स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जन्म-मृत्यू रजिस्ट्रार किंवा संबंधित प्राधिकरणाने नोंद केलेली जन्म तारीख वैध धरण्यात येईल. याशिवाय मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून जारी करण्यात आलेला शाळेचा दाखलाही ग्राह्य धरण्यात येईल.

  • पॅन कार्डचाही वापर करता येईल

  • आधार किंवा इ-आधारच्या मदतीने अर्ज करता येईल

  • वाहन परवाना

  • मतदान कार्ड यांसारखे ओळखपत्र वैध


आई-वडिलांचं नाव देणं अनिवार्य नाही

नव्या नियमांनुसार, पासपोर्टच्या अर्जामध्ये आई किंवा वडिलांचं नाव देणं अनिवार्य नाही. अर्जदार आता कायदेशीर पालकाचं नाव देऊ शकतो. या नियमामुळे सिंगल पॅरेंट किंवा अनाथ व्यक्तींना दिलासा मिळेल. याशिवाय साधू किंवा संन्यासी त्यांच्या आध्यात्मिक गुरुचं नाव देऊ शकतात.

कॉलमची संख्या घटली

कॉलमची संख्या घटवून ती 15 वरुन 9 करण्यात आली आहे. यामध्ये A, C, D, E, J आणि K कॉलम हटवण्यात आले आहेत.

प्रत सांक्षांकित करण्याच्या प्रक्रियेत बदल

जुन्या नियमांनुसार, प्रत्येक कागद नोटरी, कार्यकारी मॅजिस्ट्रेट, प्रथम श्रेणी न्यायिक मॅजिस्ट्रेट यांच्याकडून सांक्षांकित म्हणजे अॅटेस्टेड करुन आणावा लागायचा. आता अर्जदार एका साध्या कागदावर स्वयं घोषणापत्र (सेल्फ डिक्लेरेशन) देऊ शकतो. त्यामुळे प्रत सांक्षांकित करण्यासाठी जी धावपळ करावी लागायची, किंवा अनेकदा यासाठी पैसेही द्यावे लागायचे तो सर्व मनस्ताप आता वाचणार आहे.

विवाहित किंवा घटस्फोटित व्यक्ती

विवाह प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आली आहे. याशिवाय घटस्फोटित व्यक्तींना पती किंवा पत्नीचं नाव देण्याची गरज नाही.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: new passport rules declared by ministry of external affairs
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV