जिग्नेश मेवाणीच्या दिल्लीतील हुंकार रॅलीला परवानगी नाहीच

पोलिसांनी हुंकार रॅलीला परवानगी नाकारल्यामुळे संसद मार्गावरच जिग्नेश मेवाणींनी शेकडो जणांना संबोधित केलं.

जिग्नेश मेवाणीच्या दिल्लीतील हुंकार रॅलीला परवानगी नाहीच

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी सभेला परवानगी नाकारल्यानंतर गुजरातमधील आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी संसद मार्गावरच शेकडो जणांना संबोधित केलं. आपल्यावर खोटे खटले भरले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

'आम्ही सामाजिक न्यायाची भाषा करत असूनही आमची अडवणूक करण्यात येत आहे. आमच्यावर खोटे खटले भरले जात आहेत, असा आरोप जिग्नेश मेवाणी यांनी केला. प्रशांत भूषणही यावेळी उपस्थित होते.

जिग्नेश मेवाणी यांनी हुंकार रॅली काढणारच असल्याचं ठणकावून सांगितलं. मात्र परवानगी दिली नसतानाही रॅली काढली, तर कारवाई करण्याचा इशारा दिल्ली पोलिसांनी दिला आहे.

सामाजिक न्यायाचा आवाज मजबूत करणं, चंद्रशेखर यांची सुटका, युवकांना शिक्षण-रोजगाराची मागणीसाठी हुंकार रॅलीचं नियोजन करण्यात आल्याचं जिग्नेश मेवाणींनी सांगितलं होतं.

31 डिसेंबरला शनिवारवाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल जिग्नेश मेवाणी आणि ऊमर खालिद यांच्यावर याआधी पुण्यात गुन्हा नोंद आहे.

संबंधित बातम्या :


जिग्नेश मेवाणी-उमर खालिदविरोधात पुण्यात गुन्हा दाखल


पुण्यात जिग्नेश मेवाणी, उमर खालिदविरोधात पोलिसात तक्रार


पुण्यातील ‘एल्गार परिषद’ वादाच्या भोवऱ्यात

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: No Permission to Hunkar Rally by Dalit Leader Jignesh Mewani latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV