गुजरातचा एक्झिट पोल: उत्तर गुजरातमध्ये भाजप मोठा पक्ष

गुजरात विधानसभा निवडणुकीचा सर्वात मोठा एक्झिट पोल- उत्तर गुजरातचा कौल कुणाला?

गुजरातचा एक्झिट पोल: उत्तर गुजरातमध्ये भाजप मोठा पक्ष

गांधीनगर: गुजरातमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील भाजप सरकार सत्तेत येण्याचा अंदाज एबीपी न्यूज-सीएसडीएसच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे. एबीपी न्यूज-सीएसडीएसने आज सर्वात मोठा एक्झिट पोल जाहीर केला. गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल 18 डिसेंबरला जाहीर होईल.

गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागा असून 92 हा बहुमताचा आकडा आहे.

उत्तर गुजरातचा कौल कुणाला? (एकूण जागा 53)


उत्तर गुजरातमध्ये कोणाला किती टक्के मतं?
एबीपी न्यूज-सीएसडीएसच्या एक्झिट पोलमध्ये सौराष्ट्र-कच्छ आणि दक्षिण गुजरातप्रमाणेच उत्तर गुजरातमध्येही भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. उत्तर गुजरातच्या एकूण 53 जागांपैकी भाजपला 49%, काँग्रेसला 42% आणि इतरांना 9% मतं मिळण्याची चिन्हं आहेत.

UTTAR-GUJARAT-VOTE SHARE

उत्तर गुजरातमध्ये कोणला किती जागा?
मतांची टक्केवारीचं रुपांतर जागांमध्ये केल्यास उत्तर गुजरातमध्ये भाजपच्या वाट्याला 32-38 जागा, काँग्रेसच्या वाट्याला 16-22 जागा येण्याचा अंदाज आहे. उत्तर गुजरातमध्ये इतरांना खातंही उघडता येणार नाही, असं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. जागांच्या सरासरीनुसार भाजप 35 जागा, काँग्रेसला 18  जागा मिळण्याचा अंदाज आहे.

UTTAR-GUJARAT SEATS

- उत्तर गुजरातमध्येही भाजप आघाडीवर

- उत्तर गुजरात (53/182) -  भाजप 35, काँग्रेस 18 आणि इतर 0 जागांचा अंदाज

- उत्तर गुजरात (53/182) -  भाजप 49 टक्के, काँग्रेस 42 टक्के आणि इतर 9 टक्के मतांचा अंदाज

गुजरातमध्ये मोदीच

गुजरातमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांमध्ये 93 जागांसाठी मतदान पार पडलं. यानंतर एबीपी न्यूज-सीएसडीएसचा एक्झिट पोल जाहीर करण्यात आला.

GUJRAT-Exit-POLL

यानुसार सौराष्ट्र-कच्छ, दक्षिण गुजरात, मध्य गुजरात आणि उत्तर गुजरातमध्ये भाजपच स्पष्ट मुसंडी मारण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. 182 जागांपैकी भाजपला तब्बल 117 जागा मिळण्याचं भाकित वर्तवण्यात आलं आहे. तर काँग्रसेला 64 जागा आणि इतरांना 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

-------------------

गुजरातमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांमध्ये 93 जागांसाठी मतदान झालं आहे. आज गुजरातचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं.

यापूर्वी गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यतील 19 जिल्ह्यांमध्ये 89 जागांसाठी 9 डिसेंबरला 68 टक्के मतदान झालं होतं.

गुजरातमधील 182 जागांमध्ये जनतेचा कौल कोणाला हे 18 डिसेंबरला समजेल. गुजरातचा निकाल 18 डिसेंबरला जाहीर होईल. गुजरात आणि हिमाचल निवडणुकीचे सुपरफास्ट निकाल तुम्ही 18 तारखेला एबीपी माझावर पाहू शकाल.

मात्र त्यापूर्वी मतदान झाल्यानंतर म्हणजेच आज संध्याकाळपासून, एबीपी माझाच्या वेबसाईटवर गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर होईल.

संध्याकाळी 6 नंतर एक्झिट पोलचे आकडे जाहीर होतील.

संबंधित बातम्या

गुजरातचा सर्वात मोठा एक्झिट पोल

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: north gujarat elections exit poll, Gujarat Assembly Elections 2017 Latest News Marathi
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV