ओम प्रकाश रावत देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

कायदे मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

ओम प्रकाश रावत देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

नवी दिल्ली : सध्या निवडणूक आयुक्त असलेले ओम प्रकाश रावत यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी माजी अर्थसचिव अशोक लवासा यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कायदे मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती सोमवारी पदमुक्त होत आहेत. त्यांच्या जागी ओम प्रकाश रावत मंगळवारपासून पदभार स्वीकारतील.

कोण आहेत ओम प्रकाश रावत?

ओम प्रकाश रावत हे 1977 च्या बॅचचे मध्य प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी आहेत. देशाचे निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची ऑगस्ट 2015 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. केंद्र आणि राज्य पातळीवर त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेलं आहे.

निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्यकाळ पूर्ण केला होता. त्यांनी 1993 साली संरक्षण मंत्रालयाचे संचालक म्हणूनही काम पाहिलं आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Om prakash rawat oppointed as new chief
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV