14 मे पासून आठ राज्यातील 20 हजार पेट्रोल पंप दर रविवारी बंद?

By: | Last Updated: > Tuesday, 18 April 2017 10:10 PM
on 14th May 8 states fuel stations to be shut on Sundays

प्रातिनिधिक फोटो

चेन्नई : देशातल्या आठ राज्यातील 20 हजार पेट्रोल पंप 14 मेपासून दर रविवारी बंद राहणार आहेत. पंतप्रधान मोदींनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

या आठ राज्यांमध्ये तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, पुडुचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, महाराष्ट्र आणि हारियाणा आदी राज्यांचा समावेश आहे. पेट्रोल पंप डिलर्सच्या एका संघटनेनं याबाबत माहिती दिली.

या संघटनेचे एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सदस्य सुरेश कुमार यांनी सांगितलं की, ”काही वर्षांपूर्वीच आम्ही याबाबतचा निर्णय घेतला होता. पण तेल कंपन्यांनी आमच्या या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे अद्याप या निर्णयावर आंमलबजावणी झाली नव्हती. पण 14 मेपासून दर रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.”

पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा हा निर्णय पंतप्रधान मोदींच्या ‘मन कि बात’मधील तेल बचतीच्या आहवानाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच या निर्णयामुळे पेट्रोल पंप चालकांना 150 कोटींचा फटकाही बसू शकतो, असा अंदाजही कुमार यांनी व्यक्त केला.

दरम्यान, या निर्णयाला तेल उत्पादक कंपन्यांनी समर्थन दिलं नाही. पण त्यांच्याशी या मुद्द्यावरुन चर्चा सुरु असल्याचंही कुमार यांनी सांगितलं.

First Published:

Related Stories

भारताकडे ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर, नेदरलँडच्या पंतप्रधानांकडून मोदींचं स्वागत
भारताकडे ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर, नेदरलँडच्या पंतप्रधानांकडून...

अॅमस्टरडॅम : अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट

जीएसटीनंतर सुरुवातीला जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा तुटवडा?
जीएसटीनंतर सुरुवातीला जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा तुटवडा?

मुंबई : सरकारने 1 जुलैपासून देशात जीएसटी लागू करण्याची जोरदार तयारी

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/06/2017

मराठवाडा वगळता राज्यभरात पावसाची दमदार बॅटिंग, नागपूरमध्ये

मिसेस मोदींसाठी व्हाईट हाऊसच्या गार्ड्सनी दरवाजे उघडले?
मिसेस मोदींसाठी व्हाईट हाऊसच्या गार्ड्सनी दरवाजे उघडले?

वॉशिंग्टन : जगातील दोन शक्तिशाली देशांच्या प्रमुख नेत्यांची

तू मोलकरणीसारखी दिसतेस, मेघालयच्या महिलेचा दिल्लीत अवमान
तू मोलकरणीसारखी दिसतेस, मेघालयच्या महिलेचा दिल्लीत अवमान

नवी दिल्ली : ईशान्येकडील राज्यातील नागरिकांना देशातच अनेकवेळा

चीनची दादागिरी, कैलास मानसरोवर यात्रा रोखली
चीनची दादागिरी, कैलास मानसरोवर यात्रा रोखली

नवी दिल्ली: चीनने पुन्हा एकदा दादागिरी दाखवता भारतावर डोळे वटारले

मोदी-ट्रम्प भेटीतील महत्त्वाचे 5 मुद्दे !
मोदी-ट्रम्प भेटीतील महत्त्वाचे 5 मुद्दे !

वॉशिंग्टन: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष

मगरीच्या हल्ल्यात जखमी युवकावर ट्रेसपासिंगचा गुन्हा
मगरीच्या हल्ल्यात जखमी युवकावर ट्रेसपासिंगचा गुन्हा

बंगळुरु : बंगळुरुत मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागपुरातील

हिजबुलचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित
हिजबुलचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

वॉशिंग्टन : अमेरिकेनं पाकिस्तानी दहशतवादी सय्यद सलाउद्दीनला

राज्यातील शेतकरी आंदोलनात नितीश कुमारही सहभागी होणार!
राज्यातील शेतकरी आंदोलनात नितीश कुमारही सहभागी होणार!

पाटणा : राज्यात सप्टेंबरमध्ये होणाऱ्या शेतकरी आंदोलनात बिहारचे