विरोधकांची मोट बांधण्यासाठी सोनिया गांधींचा पुढाकार

केंद्रातील भाजप सरकारविरोधात विरोधकांची मोट बांधण्यासाठी आता काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी पुढाकार घेतल्याचं दिसतं आहे.

विरोधकांची मोट बांधण्यासाठी सोनिया गांधींचा पुढाकार

 

नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारविरोधात विरोधकांची मोट बांधण्यासाठी आता काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी पुढाकार घेतल्याचं दिसतं आहे. कारण उद्या म्हणजे 1 फेब्रुवारीला सोनिया गांधींनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे.

या बैठकीसाठी सगळ्या समविचारी पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण धाडण्यात आलं आहे. शिवाय 9 फेब्रुवारीला सोनियांनी या नेत्यांसाठी डिनरचंही आयोजन केलं आहे.

दोनच दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची चर्चा झाली. ज्याचं नेतृत्व काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांनी केलं होतं. मात्र या बैठकीला बहुजन समाज पक्ष, समाजवादी पार्टीचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते.

दरम्यान, सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं असून यावेळी संसदेत विरोधकांनी कोणती भूमिका घ्यायची याची रणनिती आखण्यासाठी ही डिनर डिप्लोमेसी असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: On February 1 Sonia Gandhi called a meeting of the opposition parties latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV