देशात केवळ 32 टक्के महिलांकडे पॅन कार्ड

पॅन कार्ड मिळवणाऱ्यांमध्ये केवळ 32 टक्के महिला, तर इतर सर्व पुरुष आहेत.

देशात केवळ 32 टक्के महिलांकडे पॅन कार्ड

नवी दिल्ली : पर्मनंट अकाऊंट नंबर म्हणजेच पॅन कार्डच्या बाबतीत महिला पुरुषांच्या मागे आहेत. आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार, पॅन कार्ड मिळवणाऱ्यांमध्ये केवळ 32 टक्के महिला, तर इतर सर्व पुरुष आहेत.

पॅन कार्ड हे आर्थिक ओळखपत्र आहे. बँकेसारख्या अनेक प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्डची गरज पडते. नवजात बाळाचंही पॅन कार्ड काढलं जाऊ शकतं.

आयकर विभागाची आकडेवारी काय सांगते?

आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार, 31 मार्च 2017 पर्यंत एकूण 28.57 कोटींपेक्षाही जास्त पॅन कार्ड जारी करण्यात आले. यामध्ये 19.45 कोटी म्हणजे 68 टक्क्यांपेक्षाही जास्त पुरुषांची नावं होती. तर 9.12 कोटी म्हणजे 32 टक्के महिलांचा समावेश होता. अनेक घरांमध्ये कुटुंब प्रमुख पुरुष असतात. त्यामुळे आर्थिक व्यवहार हे पुरुषांकडूनच जास्त होतात. विशेष म्हणजे देशातील 101 अब्जाधीशांमध्ये चार महिलांचाही समावेश आहे.

वयानुसार पॅन कार्डची आकडेवारी

आकडेवारीनुसार, 25 टक्क्यांपेक्षाही जास्त पॅन कार्ड 20 वर्षांपेक्षा जास्त आणि 30 वर्षांच्या आत वय असणाऱ्या व्यक्तींच्या नावावर आहेत. यामध्ये 18 ते 20 वयोगटातील पुरुष दुसऱ्या स्थानावर आहेत. तर 12 टक्क्यांहून अधिक पॅन कार्ड 20 ते 30 या वयोगटातील महिलांच्या नावावर आहेत. नोकरीसाठी 18 वर्षे वयाची गरज आहे. मात्र जास्तीत जास्त व्यक्ती नोकरी वयाच्या 20 वर्षांनंतरच करतात. त्यामुळे याच वयोगटात पॅन कार्डधारकांची संख्या जास्त आहे.

पुरुषांच्या तुलनेत पॅनकार्डधारक महिलांची संख्या कमी असण्याचं कारण म्हणजे एकूण श्रमशक्तीमधील महिलांचा सहभाग हे देखील आहे. लोकसभेत सरकारकडून सांगण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, महिला कामगारांची टक्केवारी 2012-13 मध्ये 25 टक्के होती, तर ती 2013-14 मध्ये 30 टक्के झाली आणि 2015-16 मध्ये ती घटून 25.8 टक्के झाली आहे. महिला पॅनकार्डधारकांची संख्या कमी असण्याचं हे देखील एक कारण असू शकतं.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: only 32 percent womens have
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: pan card पॅन कार्ड
First Published:

Related Stories

LiveTV