अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर राम मंदिरच उभं राहणार : सरसंघचालक

कर्नाटकातल्या धर्मसंसदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर राम मंदिरच उभं राहणार : सरसंघचालक

बंगळुरु : अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर राम मंदिराशिवाय दुसरी कोणतीच वास्तू उभी राहणार नाही, तिथे फक्त राम मंदिरच उभं राहणार, असं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.

कर्नाटकातल्या धर्मसंसदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. एकीकडे राम मंदिराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विविध धर्मगुरूंनी चर्चेचा मार्ग पत्कारला आहे. अशात मोहन भागवतांनी राम मंदिराच्या हट्टाचा पुनरुच्चार केला आहे.

दरम्यान अयोध्या वादाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. 5 डिसेंबरपासून अयोध्या वादावर तीन न्यायधीशांच्या खंडपीठाकडून सुनावणी सुरु होणार आहे.

पाहा व्हिडिओ :राम मंदिर प्रकरणावर एक नजर

  • अयोध्येत श्री रामाचा जन्म झाल्याची धारणा हिंदूंची आहे.  • हिंदू पक्षाचा आरोप आहे की 16 व्या शतकात राम मंदिर तोडून बाबरी मस्जिद बांधण्यात आली.  • ज्यावेळी मशिदीत श्री रामाची मूर्ती ठेवली तेव्हापासून म्हणजेच 1949 पासून हा वाद सुरु आहे.  • 1980 च्या शेवटी आणि 1990 च्या दशकाच्या सुरुवातील भाजपने हा मुद्दा हाती घेतला.  • 6 डिसेंबर 1992 रोजी वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली.


2010 मध्ये हायकोर्टाने काय निर्णय दिला होता?

  • अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने अयोध्येतील विवादित स्थळ राम जन्मभूमी असल्याचं मान्य केलं होतं.  • हायकोर्टाच्या दोन न्यायाधीशांनी निर्णय देताना, जमीनीचा एक तृतीयांश जागा मुस्लिम गटाला दिली होती. तीन गटात ही जमीन विभागण्याचा निर्णय दिला होता. मात्र त्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केलं होतं.  • श्री रामाची मूर्ती 22/23 डिसेंबर 1949 च्या रात्री मशिदीत ठेवली असं हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी म्हटलं होतं.  • भारतीय पुरातत्व विभागाने मशिदीच्या जागी खोदकाम केलं होतं, त्यावेळी त्यांना भव्य प्राचीन मंदिराचे अवशेष मिळाले होते.  • हा खटला गेल्या 65 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Only ram mandir will build on Ayodhya land nothing else says mohan bhagwat
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV