कंडोमच्या फक्त 'त्या' जाहिरातींना सकाळी 6 ते रात्री 10 बंदी

ज्या जाहिरातींतून महिलांना लैंगिक उपभोगाची वस्तू म्हणून दाखवलं जात नाही, मात्र सुरक्षित शारीरिक संबंधाची माहिती नागरिकांना दिली जाते, त्या जाहिराती सकाळच्या वेळेत दाखवण्यास आक्षेप नसल्याचं सांगण्यात आलं.

कंडोमच्या फक्त 'त्या' जाहिरातींना सकाळी 6 ते रात्री 10 बंदी

नवी दिल्ली : कंडोमच्या जाहिराती सकाळी 6 ते रात्री दहा वाजताच्या दरम्यान दाखवण्यावर आणलेल्या बंदीवरुन केंद्राने एक पाऊल मागे घेतलं आहे. थेट लैंगिक दृश्यं दाखवणाऱ्या कंडोमच्या जाहिराती दिवसा प्रक्षेपित करण्यास बंदी असल्याचं स्पष्टीकरण माहिती आणि प्रसारण विभागाने दिलं आहे.

कंडोमच्या जाहिराती रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतच जाहिराती दाखवाव्यात, असे आदेश केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले होते. कंडोमच्या जाहिराती या एका विशिष्ट वयोगटातील व्यक्तींसाठी आहेत, त्या लहान मुलांसाठी निरुपयोगी असल्यामुळे विशिष्ट वेळेतच दाखवण्याची सूचना केंद्राने दिली होती.

एखाद्या कंडोम ब्रँडच्या प्रमोशनसाठी लैंगिकदृष्ट्या उघड दृश्यं दाखवणाऱ्या जाहिरातींना हा आदेश लागू होता.

आता कंडोमच्या जाहिराती फक्त या वेळेतच दिसणार!


ज्या जाहिरातींतून महिलांना लैंगिक उपभोगाची वस्तू म्हणून दाखवलं जात नाही, मात्र सुरक्षित शारीरिक संबंधाची माहिती नागरिकांना दिली जाते, त्या जाहिराती सकाळच्या वेळेत दाखवण्यास आक्षेप नसल्याचं सांगण्यात आलं.

11 डिसेंबरला केंद्राने सर्व टीव्ही वाहिन्यांना सकाळी 6 ते रात्री 10 वाजताच्या दरम्यान कंडोमच्या जाहिराती प्रक्षेपित न करण्याची नोटीस जारी केली होती. या निर्णयाविरोधात सर्वसामान्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. सोशल मीडियावरही यावर ट्रोलिंग सुरु होतं.

केंद्राच्या निर्णयाविरोधात एका एनजीओने राजस्थान हायकोर्टात धाव घेतली होती. ही नोटीस जारी करण्यामागील कारणं एनजीओने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला विचारली होती.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Only sexually explicit condom ads banned between 6 am and 10 pm, I&B ministry clarifies latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV