50 हजारांच्या बँक व्यवहारांसाठी आता ओळखपत्र अनिवार्य

बँकांमध्ये 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढणे अथवा जमा करणे, परदेशी चलनातील पाच लाखांहून अधिक रकमेचं हस्तांतरण आणि 50 लाखांहून अधिक रकमेच्या अचल मालमत्तेची विक्री यांचा समावेश अाहे

50 हजारांच्या बँक व्यवहारांसाठी आता ओळखपत्र अनिवार्य

मुंबई : कोणत्याही बँकेत किंवा वित्तीय संस्थेत 50 हजार रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचा व्यवहार करायचा असल्यास तुम्हाला ओळखपत्राची मूळ प्रत लागणार आहे. फक्त फोटोकॉपीवर तुमचं काम भागणार नाही.

आर्थिक घोटाळ्यांना पायबंद घालण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. मनी लाॅन्ड्रिंग कायद्यांतर्गत बँकांना ग्राहकांचं अाेळखपत्र तपासणं, त्याची नाेंद ठेवणं आणि माेठ्या व्यवहाराची माहिती फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटला देणं अावश्यक केलं अाहे.

अर्थ मंत्रालयानं याबाबत जीआर काढला आहे. बँकांना दाखवलेलं मूळ ओळखपत्र आणि आर्थिक दस्तऐवज यांची लिंक जुळवावी लागणार आहे. याशिवाय आधार क्रमांकही बँकांना द्यावा लागेल.

सहकारी बँक, चिट फंड कंपन्या, शेअर ब्रोकर, पतसंस्था आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनाही हा नियम लागू होणार आहे.

विशेष म्हणजे तुमचं वीज बिल, टेलिफोन बिल, पाईप गॅस बिल किंवा पोस्टपेड मोबाईल बिलावर बदललेला पत्ता असेल, तरी आर्थिक व्यवहार होऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी आधी अपडेट कराव्या लागतील.

कोणत्या व्यवहारांचा समावेश?

बँकांमध्ये 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढणे अथवा जमा करणे, परदेशी चलनातील पाच लाखांहून अधिक रकमेचं हस्तांतरण आणि 50 लाखांहून अधिक रकमेच्या अचल मालमत्तेची विक्री यांचा समावेश अाहे

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV