भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, कठुआ बलात्कारामागे पाकचा हात

जम्मू-काश्मीरमध्ये हिंसा पसरवण्यासाठी शत्रू राष्ट्राची ही चाल असल्याचा दावाही नंदकुमार सिंह चौहान यांनी केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, कठुआ बलात्कारामागे पाकचा हात

भोपाळ : जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये 8 वर्षीय चिमुकलीवर अमानुष बलात्कार करुन, तिची हत्या केली गेली. या हत्येचा निषेध करण्याऐवजी भाजप नेते नंदकुमार सिंह चौहान यांनी या घटनेमागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप केला आहे. नंदकुमार सिंह चौहान हे मध्य प्रदेश भाजपचे अध्यक्ष आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये हिंसा पसरवण्यासाठी शत्रू राष्ट्राची ही चाल असल्याचा दावाही नंदकुमार सिंह चौहान यांनी केला आहे.

हिंदुस्थानी मुलीवरील बलात्कारानंतर ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या जातात म्हणजे नक्कीच पाकिस्तानी एजंटकडून देशात भेद निर्माण करण्यासाठी ते हे करत आहेत, अशी शंकाही नंदकुमार सिंह यांनी व्यक्त केली.

“काश्मिरात हिंदूंची संख्या एक टक्केही नाही. जे काही हिंदू आहेत, ते आधीपासूनच असहाय आहेत आणि आपलं तोंडही उघडू शकत नाहीत, ते ‘जय श्री राम’च्या घोषणा कशा देऊ शकतात? त्यामुळे काश्मिरात जे काही सुरु आहे, ते पाकिस्तानी एजंट करत आहेत.”, असे नंदकुमार सिंह म्हणाले.

नंदकुमार सिंह हे भाजपचे मध्यप्रदेशचे अध्यक्ष असून, खंडवा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत. भाजपमधील ज्येष्ठ आणि वजनदार नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार, हत्या प्रकरण

जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये 8 वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आठव्या आरोपीविरोधात सोमवारी आरोपपत्र दाखल करण्यात आलं. दरम्यान, या घटनेनंतर आता सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

10 जानेवारीला मुलगी खेचर चारण्यासाठी कठुआजवळच्या जंगलात गेली होती. तिथून तिचं एका अल्पवयीन आरोपीने अपहरण केलं आणि जवळच्या मंदिराच्या तळघरात लपवलं. सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष अत्याचार केले. या नराधमांनी अनन्वित अत्याचारानंतर तिची हत्या केली.

शोधाशोध करुन थकल्यावर 12 जानेवारीला तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली.

17 जानेवारीला जंगलात तिचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एसआयटीकडे सोपवण्यात आला. मुख्य आरोपी आणि माजी सरकारी अधिकारी संजी राम हा दोन महिने फरार होता. मार्चमध्ये संजी राम स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. मेरठमधून त्याचा मुलगा विशालला अटक करण्यात आली.

संजी रामला मदत करणं आणि चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. दोन महिन्यांनी आरोपपत्र दाखल करण्यास वकिलांनी विरोध केल्याने देशभरातून संतापाची लाट उसळली आहे.

संबंधित बातम्या :

काश्मिरात चिमुकलीची बलात्कार करुन हत्या

बलात्काराच्या घटनांविरोधात राहुल-प्रियांका मध्यरात्री रस्त्यावर

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pakistan agent behind Kathua Rape Case, says BJP Leader latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV