हेग (नेदरलॅण्ड्स) : आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताने" /> हेग (नेदरलॅण्ड्स) : आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताने" /> हेग (नेदरलॅण्ड्स) : आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताने" /> हेग (नेदरलॅण्ड्स) : आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताने" />

भारताचा विजय, कुलभूषण जाधवांची फाशी तूर्तास रोखली

भारताचा विजय, कुलभूषण जाधवांची फाशी तूर्तास रोखली

हेग (नेदरलॅण्ड्स) : आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला आहे. "महाराष्ट्राचे नागरिक कुलभूषण जाधव हे हेर असल्याच्या पाकिस्तानच्या म्हणण्याला ठोस पाठबळ नाही. त्यामुळे कुलभूषण जाधव यांना अंतिम निर्णयापर्यंत फाशी दिली जाऊ नये", असं आंतरराष्ट्रीय कोर्टाने ठणकावून सांगितलं.

इतकंच नाही तर पाकिस्तानात कुलभूषण जाधव यांच्या जीवाला धोका आहे. जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निर्णय येत नाही, तोपर्यंत कुलभूषण जाधव सुरक्षित असतील, याची हमी पाकिस्तानने द्यावी, असा आदेशही कोर्टाने दिला.

व्हिएन्ना कराराचा दाखला देत आंतरराष्ट्रीय कोर्टाचे न्यायमूर्ती रॉनी अब्राहम यांनी पाकिस्तानचा युक्तीवाद खोडून काढला.

आंतराराष्ट्रीय न्यायालयातील 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने, पाकिस्तानी जेलमध्ये बंद असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या अटकेबाबत अद्याप विवाद असल्याचं मान्य केलं.

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानातील लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे.

कोर्टाची पाकिस्तानला चपराक
कोर्टाने पाकिस्तानला ठणकावत न्यायाधीश रॉनी अब्राहम यांनी पाकिस्तानचा युक्तीवाद खोडून काढला.

"कुलभूषण जाधव हे भारतीय नागरिक असल्याचं दोन्ही देशांना मान्य आहे. मात्र ते हेर असल्याचे ठोस पुरावे नाहीत. पाकिस्तानच्या पुराव्यांवरुन कुलभूषण जाधव हे हेर किंवा स्पाय असल्याचं सिद्ध होत नाही. तसंच हा खटला आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या कार्यकक्षेत येत नाही, हे पाकचं म्हणणं चुकीचं असून, थेट फाशी देता येईल हे पाकिस्तान ठरवू शकत नाही", असं कोर्ट म्हणालं.

राजदूतांना का भेटू दिलं नाही?
या सुनावणीदरम्यान कोर्टाने भारताच्या मागणीचा उल्लेख करुन, भारतीय राजदूतांना कुलभूषण जाधव यांना का भेटू दिलं नाही, असा सवाल पाकिस्तानला केला. कोणत्याही परिस्थितीत परदेशी नागरिकाला राजनैतिक मदत मिळायलाच हवी, असं कोर्ट म्हणालं.

1977 च्या व्हिएन्ना करारानुसार कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत मिळायला हवी होती. कुलभूषण जाधव यांच्या अटकेची परिस्थिती ही संदिग्ध आणि वादग्रस्त आहे. कुलभूषण जाधव यांना भेटू देण्याची मागणी पाकिस्तानने पूर्ण करणं आवश्यक होतं, असं कोर्टाने नमूद केलं.

आंतरराष्ट्रीय कोर्टाने काय म्हटलं?

 • पंतप्रधानांची सुषमा स्वराज यांच्याशी बातचीत, कोर्टाच्या आदेशावर समाधान, हरिश साळवे यांच्या कष्टाचंही मोदींकडून कौतुक

 • कोट्यवधी भारतीय आणि सत्याचा विजय, भारतीय सरकारचे अभिनंदन, सरबजित सिंह यांची बहीण दलबीर कौर यांची प्रतिक्रिया

 • कोर्टाच्या आदेशामुळे यांच्या कुटुंबीयांना आणि भारतीयांना मोठा दिलासा, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची प्रतिक्रिया

 • अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही : आंतरराष्ट्रीय कोर्ट

 • कुलभूषण जाधव हेर आहेत की नाही हे सिद्ध झालं नाही, कुलभूषण यांनी हेरगिरी केली हा पाकचा दावा टिकणारा नाही : आंतरराष्ट्रीय कोर्ट

 • कुलभूषण जाधव हे हेर असल्याचे अद्याप अस्पष्ट, पाकचे पुरावे पुरेसे नाहीत - आंंतरराष्ट्रीय कोर्ट

 • 1977 च्या व्हिएन्ना करारानुसार कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत मिळायला हवी होती - कोर्टाचा पाकला झटका

 • कुलभूषण जाधव हे भारतीय नागरिक असल्याचं दोन्ही देशांकडून मान्य : आंंतरराष्ट्रीय कोर्ट

 • कुलभूषण जाधव यांना भेटू देण्याची मागणी पाकिस्तानने पूर्ण करणं आवश्यक होतं -आंंतरराष्ट्रीय कोर्ट

 • कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत मिळायला हवी : आंंतरराष्ट्रीय कोर्ट

 • कुलभूषण जाधव यांच्या अटकेची परिस्थिती ही संदिग्ध आणि वादग्रस्त आहे : आंंतरराष्ट्रीय कोर्ट

 • भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टाने हस्तक्षेप करण्याची मागणी केली : आंंतरराष्ट्रीय कोर्ट

 • पाकने कुलभूषण जाधवांवर हेरगिरीचा आरोप केला आहे, तर भारताने जाधवांना भेटू न दिल्याचा दावा केला आहे : कोर्ट

 • भारताकडून कुलभूषण जाधवांच्या फाशीच्या शिक्षेला वारंवार विरोध : आंंतरराष्ट्रीय कोर्ट

 • कुलभूषण जाधव फाशीप्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टात सुनावणी सुरु


--------------------

ICJ_Kulbhushan_Jadhav_Case

हेग (नेदरलॅण्ड्स) : भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणात सुनावणी करणारं आंतरराष्ट्रीय कोर्ट काही क्षणात निकाल सुनावणार आहे. आयसीजेचा फैसला दुपारी साडेतीनच्या सुमारास येण्याची शक्यता आहे. कोर्टाचे अध्यक्ष रॉनी अब्राहम निकालाचं वाचन करतील.

‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटक  झालेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

निकाल भारताच्या बाजूने लागण्याचा सरकारला विश्वास
निकाल आपल्याच बाजूने लागणार, यावर भारत सरकारचा विश्वास आहे. तर दुसरीकडे कुलभूषण जाधव सुरक्षित परत यावे, यासाठी देशभरात पूजा-अर्चा, होम-हवन सुरु आहे. वाराणसीमध्ये कूलभूषण यांच्या सुरक्षिततेसाठी पूजा करण्यात आली.

कुलभूषण जाधव यांच्याशी संपर्क करण्यासाठी भारताने 16 वेळा विनंती केली होती. पण परराष्ट्र नियमांचे उल्लंघन करत पाकिस्तानने मागणी फेटाळली होती. त्यानंतर भारताने 8 मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं दार ठोठावलं होतं.

नेदरलॅण्ड्समधील हेगमध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी मागील आठवड्यात झाली होती. यात भारत आणि पाकिस्तानचे वकिलांनी युक्तीवाद केला होता. भारताकडून ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी बाजू मांडली होती.

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती
सुनावणीदरम्यान भारताने पाकिस्तानवर व्हिएन्ना करारचं उल्लंघन केल्याचा आरोप करत, कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली.

भारताचा दावा फेटाळला तर...
आजचा निर्णय भारताच्या बाजूने लागला तर भारताला काऊन्सिल एक्सेस मिळेल, जेणेकरुन कुलभूषण प्रकरणात मदत मिळू शकते. तर पाकिस्तानला आशा आहे की, हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही, यावर कोर्ट लक्ष देईल. पाकिस्तानचा दावा सिद्ध झाला तर भारताची बाजू फेटाळली जाईल आणि कुलभूषण जाधव यांना मदत मिळू शकत नाही. कुलभूषण जाधव यांच्या कथित कबुलीनाम्याचा व्हिडीओ कोर्टात दाखवण्यास परवानगी नाकारणं हेदेखील भारताच्या बाजूने मानलं जात आहे.

कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.

जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे. ‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.

संबंधित बातम्या :

कुलभूषण जाधव प्रकरणी काही तासातच फैसला

पाकचा सर्वात मोठा पुरावा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळला!

आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती

भारताची पहिली चाल यशस्वी: अॅड. उज्ज्वल निकम

कुलभूषण जाधवांच्या कथित कबुलनाम्याच्या व्हिडीओत 102 कट्स

कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी जोरदार हालचाली

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV