सोनं खरेदीबाबत केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

यापुढे दोन लाखांच्या सोनं खरेदीवर पॅनकार्ड दाखवण्याची गरज नाही. याआधी ही मर्यादा फक्त 50,000 पर्यंतच होती.

सोनं खरेदीबाबत केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : जीएसटी काउन्सिलच्या आजच्या बैठकीत सोनं खरेदीबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ज्वेलर्स आणि ग्राहकांना देखील दिलासा मिळाला आहे.

यापुढे दोन लाखांच्या सोनं खरेदीवर पॅनकार्ड दाखवण्याची गरज नाही. याआधी ही मर्यादा फक्त 50,000 पर्यंतच होती. ऐन सणाच्या वेळी हा निर्णय घेण्यात आल्यानं सोन्याच्या व्यवहारात वाढ होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

50 हजारांपर्यंतच्या जेम्स, ज्वेलरीच्या खरेदीसाठी पॅन कार्ड आवश्यक असल्याचा नियम आता काढून टाकण्यात आला आहे. आता दोन लाखांच्या वरील जेम्स, ज्वेलरी, प्रीशियस स्टोन खरेदीवर पॅन कार्ड आवश्यक असेल.

सरकारनं पीएमएलए (प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट) च्या अंतर्गत ज्वेलरी सेक्टरला बाहेर काढलं आहे. त्यामुळे आता 2 लाखांच्या सोनं खरेदीवर पॅनकार्ड देण्याची ग्राहकांना गरज पडणार नाही.

संबंधित बातम्या :
जीएसटी काऊन्सिलचा छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV