पंचकुला हिंसाचारप्रकरणी हनीप्रीतवर आरोप निश्चित होणार!

राम रहीमला बलात्कारप्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर पंचकुलामध्ये मोठा हिंसाचार झाला होता. याचप्रकरणी हनीप्रीतसह अन्य 15 आरोपींविरोधात आज पंचकुला कोर्टात सुनावणी होणार आहे.

पंचकुला हिंसाचारप्रकरणी हनीप्रीतवर आरोप निश्चित होणार!

हरियाणा : राम रहीमला बलात्कारप्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर पंचकुलामध्ये मोठा हिंसाचार झाला होता. याचप्रकरणी हनीप्रीतसह अन्य 15 आरोपींविरोधात आज पंचकुला कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटबाबत आज सुनावणीत चर्चा होणार आहे.

हनीप्रीतसह अन्य आरोपी कोर्टात हजर राहणार

हरियाणा पोलिसांनी दाखल केल्या चार्जशिटमध्ये जी कलमं लावली आहेत त्यांचा जर बचाव पक्षाकडून विरोध झाला नाही तर कोर्ट याप्रकरणी आजच आरोप निश्चित करु शकतं. या प्रकरणाची सुनावणी सकाळी 10 वाजता होणार आहे. या सुनावणीवेळी हनीप्रीतसह अन्य आरोपींनाही कोर्टात हजर केलं जाईल.

हनीप्रीतवर देशद्रोहाचा आरोप

हनीप्रीत सध्या अंबाला जेलमध्ये आहे. 28 नोव्हेंबरला हरियाणा पोलिसांनी हनीप्रीतसह 15 जणांविरोधात चार्जशीट दाखल केलं होतं. या चार्जशीटमध्ये सर्व आरोपींना हिंसेच्या घटनेसाठी आरोपी ठरवण्यात आलं आहे. हनीप्रीतवर कट रचणं, देशद्रोह यासारखे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

बाबा राम रहीमला 2002च्या साध्वी बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आल्यानंतर सिरसा, पंचकुला या शहरांसह हरियाणा, पंजाबमध्ये राम रहीमच्या कथित समर्थकांनी धुडगूस घातला होता. यामध्ये 31 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच लाखोंच्या संपत्तीचं नुकसान झालं होतं.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

एप्रिल 2002 : 2002 मध्ये साध्वींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप बाबा गुरमीत राम रहीमवर आहेत. साध्वीने एप्रिल 2002 मध्ये तत्कालिन मीडिया, पंजाब-हरियाणा हायकोर्टाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पत्र लिहून राम रहीमवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर हायकोर्टाने 24 सप्टेंबर 2002 रोजी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.

मे 2002 : तक्रारीच्या पत्राची पडताळणी केल्यानंतर तपासाची जबाबदारी सिरसा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांवर सोपवली होती.

डिसेंबर 2002 : तक्रार योग्य असल्याचं सिद्ध झाल्यानंतर राम रहीमविरोधात कलम 376, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

डिसेंबर 2003 : ह्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. तपास अधिकारी सतीश डागर यांनी चौकशी सुरु केली आणि 2005-2006 मध्ये लैंगिक शोषण झालेल्या साध्वीला शोधून काढलं.

जुलै 2007 : सीबीआयने प्रकरणाचा पूर्ण तपास करुन अंबाला सीबीआय कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. अंबालावरुन हे प्रकरण पंचकुला सीबीआय कोर्टात ट्रान्सफर केलं. आरोपपत्रानुसार डेरामध्ये 1999 आणि 2001 मध्ये आणखी काही साध्वींचंही लैंगिक शोषण झालं होतं. पण त्यांचा पत्ता लागला नाही.

ऑगस्ट 2008 : प्रकरणाचा खटला सुरु झाला आणि डेरा प्रमुख राम रहीमविरोधात आरोप निश्चित करण्यात आले.

2011 ते 2016 : प्रकरणाचा खटला चालला. डेरा प्रमुख राम रहीमकडून वकील सातत्याने बाजू लढवत राहिले.

जुलै 2016 : खटल्याच्या सुनावणीदरम्यान 52 साक्षीदारांचा जबाब नोंदवला. यामध्ये 15 सरकारकडून आणि 37 बचाव पक्षाचे होते.

जून 2017 कोर्टाने डेरा प्रमुख बाबा राम रहीमच्या परदेश प्रवासावर बंदी घातली.

25 जुलै 2017 :  सीबीआय कोर्टाने या प्रकरणात दररोज सुनावणी करण्याचे निर्देश दिले, जेणेकरुन लवकरच निकाल लावता येईल.

17 ऑगस्ट 2017 दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपला आणि निकालासाठी 25 ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली.

25 ऑगस्ट 2017 बाबा राम रहीमला बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं. 

28 ऑगस्ट 2017 2002 मधील साध्वी बलात्कार प्रकरणी ‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख बाबा राम रहीमला वीस वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.


संबंधित बातम्या :


'बाबा राम रहिम जेलमध्ये ढसाढसा रडतो'

राम रहीमचा मुलगा डेराच्या हजारो कोटी संपत्तीचा वारसदार!

तुरुंगात बाबा राम रहीमचा दिनक्रम काय?

VVIP ट्रिटमेंटची मागणी, कोर्टाने राम रहीमला झापलं

राम रहीमने 300 साध्वींवर बलात्कार केला, माजी सुरक्षा रक्षकाचा गौप्यस्फोट 

10 वर्षे नव्हे, दोन बलात्कार प्रकरणी राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा!

हेलिकॉप्टरमधून तुरुंगात जाऊन निर्णय देणारे डॅशिंग जज : जगदीप सिंग!

20 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राम रहीमकडे आता पर्याय काय?

Ram Rahim Rape Case : राम रहीमला 10 वर्षांची शिक्षा

बाबा राम रहीमचा फैसला, रोहतक तुरुंगात शिक्षेची सुनावणी 

हजार रुपयाच्या मोबदल्यात हरियाणात भाडोत्री गुंडांकडून हिंसा?

न्यायाधीश तुरुंगात जाऊन राम रहीमला शिक्षा सुनावणार!

राम रहीमच्या डेरावर कारवाई, मुख्यालयात सैन्य घुसलं 

गुरमीत राम रहीमनंतर ‘ही’ महिला डेरा सच्चा सौदाची प्रमुख? 

व्हिडिओ : पंचकुलामध्ये राम रहीमच्या गुंडांचा जिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला 

बाबा राम रहीमला व्हीआयपी ट्रीटमेंट, एसी खोलीत रात्र घालवली 

बाबा राम रहीम समर्थकांचा पंजाब-हरियाणात धुडगूस, 30 जणांचा मृत्यू 

भाजप खासदार साक्षी महाराजांकडून राम रहीमचं समर्थन 

अमित शाह आणि मोदींची बैठक, मनोहरलाल खट्टर यांची खुर्ची धोक्यात? 

कोर्टातून हेलिकॉप्टरने थेट तुरुंगात, राम रहीम कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात 

राम रहीमची संपत्ती विकून लोकांना नुकसान भरपाई द्या : हायकोर्ट 

बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीम दोषी
भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: panchkula violence honeypreet 15 others charged with sedition latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV