तुमच्या बारवाल्यापेक्षा आमचा चहावाला चांगला : परेश रावल

अभिनेता आणि भाजप खासदार परेश रावल यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

तुमच्या बारवाल्यापेक्षा आमचा चहावाला चांगला : परेश रावल

मुंबई : अभिनेता आणि भाजप खासदार परेश रावल यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 'तुमच्या बारवाल्यापेक्षा आमचा चहावाला चांगला' असं ट्वीट परेश रावल यांनी काल (मंगळवार) रात्री केलं होतं.

paresh rawal tweet 1

त्यांच्या या ट्वीटवर अनेकांनी तात्काळ नाराजी व्यक्त केली. त्यामुळे परेश रावल यांनी आपलं ते वादग्रस्त ट्वीट डिलीट करुन माफीही मागितली. 'मी ट्विट डिलीट केलं आहे. कारण की, ते चुकीचं होतं. कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफी मागतो.' असं दुसरं ट्वीटही त्यांनी केलं.नेमका वाद काय?

पंतप्रधान मोदी हे लहानपणी चहा विकत होते. यावरुनच काँग्रेसनं ट्विटरवरुन मोदींवर खोचक टीका केली होती. त्यामुळे याविरोधात भाजपनं काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. याच सर्व प्रकरणानंतर परेश रावल यांनी काँग्रेसवर टीका करणारं ट्वीट केलं होतं.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: paresh rawal’s Controversial tweet on Congress latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV