संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (सोमवार) सुरु होणार आहे. गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

 

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (सोमवार) सुरु होणार आहे. गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त रविवारी केंद्र सरकारच्यावतीने सर्वपक्षीय बैठकही बोलवण्यात आली होती.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात

या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने होणार आहे. राष्ट्रपतींच्या या अभिभाषणातून मोदी सरकार आपल्या मागील चार वर्षाचा लेखाजोखा मांडू शकतं. तसेच पुढील एक वर्ष सरकारचा  काय अजेंडा असेल याचा देखील आढावा घेतला जाऊ शकतो.

राष्ट्रपतींचं अभिभाषण सकाळी 11 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सुरु होईल. आज सरकार आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करेल आणि 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल. या अर्थसंकल्पीय अधिवेशनचा पहिला टप्पा 29 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.

महागाईवर मोदी सरकार विरोधकांना उत्तर देणार?

दरम्यान, मागील काही दिवसांपासून विरोधकांनी मोदी सरकारला महागाई आणि बेरोजगारी यावरुन घेरलं आहे. ज्यावर मोदी सरकारनं आतापर्यंत कोणतंही ठोस उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे आजच्या अभिभाषणातून मोदी सरकार मजबूत अर्थव्यवस्थेचा दावा करु शकतं.

तिहेरी तलाकबंदी विधेयक संमत करण्याचं आवाहन

दरम्यान, काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनात तिहेरी तलाकबंदी विधेयक संमत करण्याचे आवाहनही सर्व पक्षांना केले. हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले असले तरी राज्यसभेत विरोधकांनी त्यात सुधारणा सुचवल्या आहेत. त्यामुळे या अधिवेशनात तरी हे विधेयक संमत होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: parliament budget session starts today latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV