पासपोर्ट यापुढे अधिकृत रहिवासी दाखला नसणार?

नवी सीरिज आणताना पासपोर्टचं शेवटचं पान ब्लँक ठेवण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

पासपोर्ट यापुढे अधिकृत रहिवासी दाखला नसणार?

नवी दिल्ली : आतापर्यंत पासपोर्ट हा अधिकृत रहिवासी दाखला मानला जात असे, मात्र परराष्ट्र मंत्रालयाला आलेल्या प्रस्तावानुसार यापुढे पासपोर्टचा हा दर्जा जाण्याची चिन्हं आहेत. पासपोर्टधारकाचा पत्ता असलेलं शेवटचं पान हटवण्याच्या हालचाली सुरु आहेत.

नवी सीरिज आणताना पासपोर्टचं शेवटचं पान ब्लँक ठेवण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. पासपोर्टचे तपशील संरक्षित ठेवण्यासाठी हे पाऊल उचललं जाणार आहे. 'हिंदुस्तान टाइम्स' वृत्तापत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे. मात्र परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

सध्या, पारपत्राच्या पहिल्या पानावर फोटो आणि पासपोर्टधारकाचे इतर तपशील छापलेले असतात, तर पत्ता शेवटच्या पानावर असतो. मात्र पासपोर्ट ऑफिस आणि इमिग्रेशन विभाग (किंवा सुरक्षा अधिकारी) यांच्याकडे पासपोर्टधारकाचा पत्ता असल्यामुळे शेवटचं पान असो, वा नसो, काहीच फरक पडत नाही.

2012 पासून सर्वच पासपोर्टवर बारकोड लावण्यात आले असून ते स्कॅन करताच ही माहिती उपलब्ध होऊ शकते. नवीन सीरिज आणल्यानंतरही सद्य पासपोर्ट त्यांच्या एक्स्पायरी डेटपर्यंत वैध राहतील.

पासपोर्टच्या रंगात बदल करण्याबाबतही परराष्ट्र मंत्रालय विचार करत आहे. सध्या हे पासपोर्ट तीन रंगाचे आहेत. सरकारी कामासाठी परदेशी जाणाऱ्या अधिकारी किंवा व्यक्तींसाठी पांढरा, दूतावास (डिप्लोमॅट) अधिकाऱ्यांसाठी लाल, तर उर्वरित सर्वांसाठी (इमिग्रेशन चेकची आवश्यकता असलेले- ECR आणि नसलेले - ECNR) निळा रंग.

यापुढे इमिग्रेशनची आवश्यकता असणाऱ्यांना केशरी रंगाचा पासपोर्ट दिला जाण्याची चिन्हं आहेत. रंगावरुनच कोणाचं इमिग्रेशन आवश्यक आहे, हे समजल्यामुळे इमिग्रेशन प्रक्रिया जलद होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नवीन सीरिज आणल्यानंतरही सद्य ECR पासपोर्ट त्यांच्या एक्स्पायरी डेटपर्यंत वैध राहतील.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Passports may no longer be valid proof of address latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV