क्रेडिट कार्डमधून Paytmमध्ये पैसे भरल्यास आता 2% चार्ज!

By: एबीपी माझा वेबी टीम | Last Updated: Thursday, 9 March 2017 11:56 AM
क्रेडिट कार्डमधून Paytmमध्ये पैसे भरल्यास आता 2% चार्ज!

मुंबई: क्रेडिट कार्डच्या माध्यमातून Paytm वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर केल्यास आता यूर्जसला दोन टक्के अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार आहे. बँक ट्रांझॅक्शन चार्ज द्यावा लागू नये यासाठी अनेकजण पेटीएमचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर कंपनीनं तात्काळ हा निर्णय घेतला.

 

नव्या नियमानुसार आता क्रेडिट कार्डमधून पेटीएममध्ये पैसे टाकल्यास दोन टक्के चार्ज द्यावा लागेल. 8 मार्चपासून हा नवा नियम लागूही करण्यात आला आहे.

 

क्रेडिट कार्डमधून पैसे टाकल्यास 2 टक्के चार्ज लागत असला तरीही नेट बँकिंग आणि डेबिट कार्डमधून पेटीएम वॉलेटमध्ये पैसे टाकण्यास मात्र कोणताच चार्ज नसेल. दरम्यान, क्रेडिट कार्डमधून पैसे टाकल्यास तुम्हाला पूर्ण कॅशबॅक मिळणार आहे.

 

क्रेडिट कार्डमधून पेटीएमवर एखादी वस्तू खरेदी किंवा बिल पेमेंट केल्यास कोणताही अतिरिक्त चार्ज लागणार नाही.

 

नोटाबंदीनंतर पेटीएमनं छोट्या दुकानदारांसाठी 0% प्लॅटफॉर्म फी सुरु केलं होतं. कारण की, त्यांनी जास्तीत जास्त पेटीएमचा वापर करावा.

 

पण अनेक यूजर्स हे पेटीएमच्या माध्यमातून पैसे स्वीकारत होते. पण कोणतंही शुल्क न देता ते आपले पैसे बँकेत जमा करत होते. त्यामुळे पेटीएमनं हा निर्णय घेतला. पेटीएमकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात असं म्हटलं आहे की, ‘कंपनीला बँक ट्रांझॅक्शनसाठी मोठी किंमत द्यावी लागते. अनेकजण क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे भरुन ते पुन्हा आपल्या बँक खात्यात टाकतात. त्यामुळे कंपनीला नुकसान सोसावं लागतं. जेव्हा यूजर्स पेटीएमवरुन एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हाच कंपनीला फायदा होतो.

 

 

संबंधित बातम्या:

 

First Published: Thursday, 9 March 2017 11:51 AM

Related Stories

देवेंद्र फडणवीसांच्या पाच आयडिया योगी आदित्यनाथांनी मागवल्या
देवेंद्र फडणवीसांच्या पाच आयडिया योगी आदित्यनाथांनी मागवल्या

मुंबई : देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/03/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/03/2017

फडणवीस सरकारचं एक पाऊल मागे, आमदारांचं निलंबन मागे घेणार, 29 मार्चला 12

पाटण्यात स्टेज कोसळल्याने लालू प्रसाद यादव जखमी
पाटण्यात स्टेज कोसळल्याने लालू प्रसाद यादव जखमी

पाटणा : पाटणामध्ये पुन्हा एकदा प्रचंड गर्दीमुळे स्टेज कोसळल्याची

मोबाईल कनेक्शनसाठी आता ई-केवायसी बंधनकारक
मोबाईल कनेक्शनसाठी आता ई-केवायसी बंधनकारक

मुंबई : नवीन मोबाईल कनेक्शन घेण्यासाठी आता आधारकार्ड सक्तीचं होणार

उद्धव ठाकरेंना मोदींकडून स्नेहभोजनाचं निमंत्रण
उद्धव ठाकरेंना मोदींकडून स्नेहभोजनाचं निमंत्रण

नवी दिल्ली : शिवसेना सातत्याने करत असलेला विरोध टाळण्यासाठी आता

विजय मल्ल्यांना भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, प्रत्यार्पणाला मंजुरी
विजय मल्ल्यांना भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, प्रत्यार्पणाला...

मुंबई : सरकारी बँकांचं कर्ज बुडवणाऱ्या विजय मल्ल्या यांच्या

सेबीचा रिलायन्स इंडस्ट्रीजला दणका, एक हजार कोटींचा दंड
सेबीचा रिलायन्स इंडस्ट्रीजला दणका, एक हजार कोटींचा दंड

नवी दिल्ली : सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने

मान्सूनवर अल निनोचा प्रभाव होणार नाही: हवामान खातं
मान्सूनवर अल निनोचा प्रभाव होणार नाही: हवामान खातं

मुंबई: भारतातल्या मान्सूनची अल निनोच्या कचाट्यातून सुटका झाल्याची

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 24/03/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 24/03/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/03/2017   पाच दिवसांनी डॉक्टरांचा संप

केंद्र सरकारकडून सूर्यफूल बियांच्या आयात शुल्कामध्ये 20 टक्के कपात
केंद्र सरकारकडून सूर्यफूल बियांच्या आयात शुल्कामध्ये 20 टक्के कपात

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सूर्यफूलाच्या बियांचे आयात शुल्क 30