सोहराबुद्दीन प्रकरणातील जजच्या मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी

मृत्यूपूर्वी सोहराबुद्दीन शेख चकमकीच्या संवेदनशील प्रकरणावर जज लोया सुनावणी करत होते.

सोहराबुद्दीन प्रकरणातील जजच्या मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी

नवी दिल्ली : सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणी सुनावणी करणारे विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश बी एच लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. पत्रकार बी. आर. लोणे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती.

1 डिसेंबर 2014 रोजी जज ब्रिजमोहन हरिकिशन लोया यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्याच्या मागणीची चीफ जस्टिस दीपक मिश्रा आणि जस्टिस ए एम खानविलकर, डी व्हाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दखल घेतली.

विशेष सीबीआय जज बी एच लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करा, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मृत्यूपूर्वी सोहराबुद्दीन शेख चकमकीच्या संवेदनशील प्रकरणावर जज लोया सुनावणी करत होते.

लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी महाराष्ट्रातील पत्रकार बी. आर. लोणे यांनी केली आहे.
या प्रकरणात विविध पोलिस अधिकारी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांचं नाव आहे.

जज लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका 8 जानेवारी रोजी बॉम्बे लॉयर्स असोसिएशनकडून मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. यावर 23 तारखेला हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Petition filed in Supreme Court to probe death of Judge BH Loya latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV