13 ऑक्टोबरला पेट्रोलपंप चालकांचा एकदिवसीय संप

विविध मागण्यांसाठी युनायटेड पेट्रोलियम फ्रंटने 13 तारखेला 1 दिवसीय संप पुकारला आहे. येत्या काही दिवसात मागण्या मान्य न झाल्यास 27 ऑक्टोबरपासून बेमुदत संप करणार असल्याचं संघटनेनं जाहीर केलं आहे.

13 ऑक्टोबरला पेट्रोलपंप चालकांचा एकदिवसीय संप

मुंबई : पेट्रोल पंप व्यवसायावरील जाचक अटी, ऑईल कंपन्यांची आणि शासनाची मनमानी यामुळे युनायटेड पेट्रोलियम फ्रंटने 13 तारखेला 1 दिवसीय संप पुकारला आहे. यामध्ये 54 हजार डिलर सहभागी होणार आहेत. 13 ऑक्टोबर रोजी देशातील 54 हजार पेट्रोल पंपांवर इंधन खरेदी-विक्री बंद राहिल.

रोज बदलणाऱ्या दरामुळे ग्राहक आणि डीलर्सचं नुकसान होत आहे. तसंच सरकार पेट्रोल डीलर्सच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. येत्या काही दिवसात मागण्या मान्य न झाल्यास 27 ऑक्टोबरपासून बेमुदत संप करणार असल्याचं संघटनेनं जाहीर केलं आहे.

डीलर्सच्या मागण्या काय?

  • 4 नोव्हेंबर 2016 चा ऑईल कंपनी बरोबर झालेला पण न पाळलेला करार

  • मार्केटिंग डिसीप्लीन गाईडलाईनमध्ये लावलेल्या प्रमाणाबाहेरील अन्यायकारक पेनल्टीज

  • कबुल केलेले पण न दिलेले डीलर मार्जिन

  • रोज बदलणाऱ्या दरामुळे ग्राहक आणि डीलर्सचे होत असलेले नुकसान

  • राज्यानुसार बदलणारे दर जे की GST मध्ये इंधन आणल्यास स्वस्त आणि समान होतील

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV