120 शहरात हजारो जणांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या महाठगास अटक

मोठमोठ्या कमिशनचं आमिष दाखवून हजारो जणांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या महाठगास राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने अटक केली आहे.

120 शहरात हजारो जणांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या महाठगास अटक

नवी दिल्ली : मोठमोठ्या कमिशनचं आमिष दाखवून हजारो जणांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या महाठगास राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने अटक केली आहे. या महाठगाने पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, हरियाणा, छत्तीसगड, मध्य प्रदेशसह अनेक राज्यातील मोठ्या शहरातील हजारो जणांना कोट्यवधींचा गंडा घातला होता.

राजस्थानच्या एसओजीने या प्रकरणी पिनकॉन कंपनीचा चेअरमन मनोरंजन रॉय आणि त्याचा आणखी एक साथीदार विनय सिंहला बंगळुरुमधून अटक केली.

अधिक माहितीनुसार, रॉयची कपंनी पश्चिम बंगालमध्ये वाइन पुरवण्याचं काम करत होती. रॉयच्या कंपनीने देशभरातील 120 शहरांमध्ये आपल्या शाखा सुरु केल्या होत्या. ज्या माध्यमातून तो हजारो जणांना मोठमोठ्या कमिशनची आमिष दाखवून गंडा घातला.

एसओजी राजस्थानचे आयजी दिनेश एमएन यांनी दावा केला कि, या महाठगाने फक्त राजस्थानमधीलच 25 हजार जणांना कोट्यवधींचा चुना लावला. या सर्वांनकडून त्याने तब्बल 56 कोटी रुपये उकळले होते. रॉयच्या कंपन्यांच्या राजस्थानमध्ये 11 शाखा होत्या. या सर्व शाखांना एसओजीने टाळं ठोकलं आहे. तसेच तिथून मिळालेली सर्व कागदपत्रं जप्त केली आहेत.

मनोरंजन रॉयच्या अटकेनंतर त्याला एसओजीच्या कोर्टात हजर केलं होतं. कोर्टानं या दोघांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

अधिक माहितीनुसार, जयपूरमधील एका व्यक्तीला काही दिवसांपूर्वी फोनद्वारे मोठमोठ्या स्कीमचं आमिष दाखवलं. हा व्यक्ती रॉयच्या टोळीच्या संपर्कात आल्यानंतर, त्यांनी त्याला कोट्यवधीच्या कमिशनचं अमिषं दाखवत, त्याच्याकडून लाखो रुपयांची गुंतवणूक करुन घेतली. त्याला काही दिवसांनंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, त्याने एसओजीकडे तक्रार दाखल केली.

पीडित व्यक्तीच्या तक्रारीनुसार, रॉयच्या कंपनीने त्याला चार वर्षात दुप्पट कमिशनचं आमिश दाखवलं होतं.  तसेच गुंतवणुकीवर 14 टक्के व्याज मिळेल, असंही सांगितलं होतं. विशेष म्हणजे, आपली कंपनी सेबीकडे रजिस्टर असल्याचंही सांगितलं होतं.

पीडित व्यक्तीच्या तक्रारीनंतर एसओजीच्या टीमने उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यात छापे टाकून महाठगांच्या या टोळीतील इतर साथीदारांना अटक केली. या व्यक्तींनी पिनकॉन कंपनीच्या नावाखाली देशभरातील विविध शहरातील हजारो जणांकडून कोट्यावधीची गुंतवणूक करुन घेतली होती.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pincon Spirits companies CMD Manoranjan Roy and director Vinay Singh were arrested for the cheating case
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV