पंतप्रधान मोदींना भूतानच्या राजकुमाराचा लळा

मोदींना या छोट्या राजकुमारासोबत खेळण्याचा मोह आवरता आला नाही.

पंतप्रधान मोदींना भूतानच्या राजकुमाराचा लळा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींना भूतानच्या छोट्या राजकुमारांचा चांगलाच लळा लागलेला पाहायला मिळाला. मोदींना या छोट्या राजकुमारासोबत खेळण्याचा मोह आवरता आला नाही.

भूतानची रॉयल फॅमिली चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे.

भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक, त्यांची पत्नी जत्सुन पेमा वांगचुक आणि त्यांचा चिमुरडा राजकुमार जिग्मे नामग्याल वांगचुक हे काल पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेले. त्यावेळी या चिमुरड्या राजकुमाराशी खेळण्याचा मोह मोदींना आवरला नाही, आणि ते त्याच्याशी खेळू लागले.

छोटा राजकुमारही पंतप्रधानांसोबत मनमोकळेपणे खेळला. यावेळी पंतप्रधान मोंदींनी त्याला फिपा अंडर 17 फुटबॉल आणि बुद्धीबळ भेट म्हणून दिलं. छोट्या राजकुमाराची ही पहिलीच भारतभेट आहे.

यापूर्वी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही भूतानच्या राजाची भेट घेतली होती. या दोघांमध्ये परराष्ट्र नितींवरुन अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.

राष्ट्रपतींची भेट

भूतानच्या या रॉयल फॅमिलीने राष्ट्रपतींचीही भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भूतानने डोकलामबाबत घेतलेल्या भूमिकेचं कौतुक केलं होतं. डोकलामबाबत भारत आणि भूतान हे एकजुटीने उभे आहेत, त्यामुळे दोन्ही देशांची मैत्री आणखी वाढली आहे, असं कोविंद म्हणाले होते.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: PM Modi meets Bhutan royals, presents official football of FIFA U-17 world cup
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV