ट्रम्प- मोदींच्या भेटीची तारीख निश्चित, 25 जूनपासून मोदी अमेरिका दौऱ्यावर

By: | Last Updated: > Monday, 12 June 2017 11:08 PM
pm modi visit us on june 25 talks with american president

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 जूनपासून दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार असून, 26 जून रोजी मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होईल. गेल्याच महिन्यात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून याबाबतचे संकेत देण्यात आले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं घेतल्यानंतर, पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींना अमेरिका भेटीचं निमंत्रण दिलं होतं. याशिवाय दोन्ही नेत्यांमध्ये आजपर्यंत तीनवेळा फोनवरुन विविध विषयांवर चर्चा झाली आहे.

भारतीय परराष्ट्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 26 जून रोजी ट्रम्प आणि मोदींची भेट होईल. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेने स्वत: ला पॅरिस करारापासून वेगळं केल्यानंतर मोदी आणि ट्रम्प यांची पहिल्यांदाच भेट असल्याने, या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. कारण पॅरिस करारातून अमेरिकेने बाहेर पडण्याच्या निर्णयाची घोषणा करताना भारत आणि चीनवर निशाणा साधला होता. या करारातून अमेरिकेच्या एक्झिटचा सर्वाधिक फायदा भारत आणि चीनला होणार असून, या करारातील अटींमुळे अमेरिकेचं मोठं नुकसान झाल्याचं ते यावेळी म्हणले होते.

याशिवाय H1-B व्हिसासंदर्भात अमेरिकेने कठोर भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवरही मोदी आणि ट्रम्प यांची भेट महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान मोदींची आठवेळा भेट झाली आहे. यात पंतप्रधान मोदींनी तीनवेळा अमेरिकेचा दौरा केला, यावेळी त्यांनी वॉशिंग्टनमध्ये ओबामांची भेट घेतली होती. तर 2015 मध्ये पंतप्रधान मोदींच्या निमंत्राणावर ओबामा भारतात आले होते.

संबंधित बातम्या

पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा ट्रम्प प्रशासनाचा निर्णय

आर्थिक मदतीसाठी भारतानं पॅरिस करारावर स्वाक्षरी केली नाही : सुषमा स्वराज

First Published:

Related Stories

दोनशे रुपयांच्या नोटा लवकरच चलनात, आरबीआयकडून छपाई सुरु
दोनशे रुपयांच्या नोटा लवकरच चलनात, आरबीआयकडून छपाई सुरु

मुंबई : नोटाबंदीनंतर सरकारने पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नवीन

‘एअर इंडिया’मधील शेअर विकण्यास केंद्र सरकारची मंजुरी
‘एअर इंडिया’मधील शेअर विकण्यास केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली : प्रचंड कर्ज आणि दिवसेंदविस वाढत जाणारा तोटा यामुळे एअर

केंद्रीय कर्मचाऱ्यांना 'अच्छे दिन', भत्तेवाढीला केंद्राची मंजुरी
केंद्रीय कर्मचाऱ्यांना 'अच्छे दिन', भत्तेवाढीला केंद्राची मंजुरी

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून सातव्या वेतन आयोगात शिफारस करण्यात

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/06/2017

युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, बँका, कंपन्यांसह ब्रिटीश

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींचा पगार किती?
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींचा पगार किती?

मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा पगार

महिलांनी रेपच्या बदल्यात जवानांची गुप्तांगं कापली, आझम बरळले
महिलांनी रेपच्या बदल्यात जवानांची गुप्तांगं कापली, आझम बरळले

लखनऊ: वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या समाजवादी पक्षाचे

पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस!
पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस!

नवी दिल्ली : इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांवर आता पॅन कार्ड नंबर आधार

राष्ट्रपती निवडणुकीसाठी यूपीएकडून मीरा कुमार यांचा अर्ज दाखल
राष्ट्रपती निवडणुकीसाठी यूपीएकडून मीरा कुमार यांचा अर्ज दाखल

नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदासाठीच्या यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार

लेह-लडाखपर्यंत रेल्वेचं जाळं, सर्वात उंचावरील रेल्वेमार्ग ठरणार
लेह-लडाखपर्यंत रेल्वेचं जाळं, सर्वात उंचावरील रेल्वेमार्ग ठरणार

लेह : चीनपासून वाढता धोका पाहता मोदी सरकारने रेल्वेचं जाळं आता

युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, भारतालाही धोका
युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, भारतालाही धोका

मुंबई : वॉनाक्रायच्या दहशतीच्या महिन्याभरानंतर नव्या पीटरॅप