…अन् पंतप्रधान मोदींनी समुद्राच्या शुद्ध पाण्याची चव चाखली!

…अन् पंतप्रधान मोदींनी समुद्राच्या शुद्ध पाण्याची चव चाखली!

हाइफा (इस्रायल) : भविष्यात पाण्याची टंचाई भासू शकते अशी चिंता गेल्या काही वर्षांपासून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करुन ते पिण्यायोग्य करावं अशी अधूनमधून चर्चाही होते. पण नंतर ही चर्चा हवेत विरुनही जाते. आपल्याकडे याबाबत फक्त चर्चाच सुरु असली तरी दुसरीकडे इस्त्रायलमध्ये मात्र हा प्रयोग सत्यात उतरला आहे. एवढंच नव्हे तर आज पंतप्रधान मोदींना या पाण्याची चवही चाखली!

सध्या पंतप्रधान मोदी हे इस्रायलचा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात इस्त्रायलसोबत अनेक करारही झाले आहेत. आज मोदींनी हाइफामधील डोर समुद्रकिनाऱ्याला भेट दिली. त्याचवेळी त्यांनी येथील मोबइल वॉटर ट्रिटमेंट प्लांटची पाहणीही केली. त्यामुळे आता हे तंत्रज्ञान भारतात येणार का? अशीही चर्चा सुरु झाली आहे.

जिथं समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करुन जे शुद्ध केलं जातं तो प्लांट पाहण्यासाठी मोदी या ठिकाणी आले होते. इथं पोहचल्यानंतर पंतप्रधान मोदींना याचं डेमोही दाखवण्यात आलं. त्यानंतर मोदी आणि नेतान्याहू दोघंही हे पाणी प्यायले. तेव्हा मोदींनी या प्लांटचं आणि तंत्रज्ञानाचं कौतुकही केलं.

फोटो सौजन्य:  सोशल मीडिया फोटो सौजन्य: सोशल मीडिया

समुद्राचं पाणी शुद्ध करणारी छोटीशी मशीन!

समुद्राचं पाणी शुद्ध करण्यासाठी इथं ‘डिसालनेशन कार’च्या मागे ट्रिटमेंट मशीन बसवण्यात आली आहे. याला 'मोबाइल सी वॉटर डिसालनेशन युनिटही' म्हटलं जातं. या छोट्याशा मशीनमधून समुद्राचे खारे पाणी शुद्ध करुन ते पिण्यायोग्य केलं जातं.

भारतातही हा प्रयोग होणार? 

या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास भारताला याचा बराच फायदा होऊ शकतो. कारण भारताला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभला आहे. महाराष्ट्र, केरळ, गोवा आणि उडिसा यासारख्या राज्यात हे वॉटर ट्रिटमेंट युनिट मिळाल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

दरम्यान, गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. तेव्हा समुद्राचं पाणी शुद्ध करण्याची चर्चाही झाली होती. पण पुढे त्याबाबत काहीही निर्णय झाला नाही.

आता खुद्द पंतप्रधान मोदींनीच समुद्राच्या शुद्ध पाण्याची चव चाखली आहे. त्यामुळे याबाबत मोदी नेमकं काय पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV