10 वर्ष सत्ता उपभोगणाऱ्यांना विकासाचा तिरस्कार : मोदी

टीकाकारांना उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. दहा वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली, ते नेहमीच विकासाचा तिरस्कार करत असल्याचं यावेळी म्हणाले.

10 वर्ष सत्ता उपभोगणाऱ्यांना विकासाचा तिरस्कार : मोदी

वडनगर : देशाची सूत्रं हाती घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी आज पहिल्यांदाज आपल्या जन्मगावी वडनगरचा दौरा केला. तब्बल सहा किमीच्या रोड शोनंतर  जनतेला मार्गदर्शन करताना, टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. दहा वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली, ते नेहमीच विकासाचा तिरस्कार करत असल्याचं यावेळी म्हणाले.

केंद्र सरकारने विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना पंतप्रधान म्हणाले की,  वाजपेयी सरकारच्या काळात सर्वात पहिल्यांदा आरोग्यासंदर्भात देशाचं धोरण निश्चित करण्यात आलं. पण दहा वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली, ते विकासाचा नेहमीच तिरस्कार करत आले आहेत. पण आमच्या सरकारने विकासासाठी नवी धोरण बनवलं.

'वडनगरच्या मातीतले संस्कार माझ्यात रुजले'

वडनगरबद्दल बोलताना मोदी पुढे म्हणाले की, "आज मी जो काही आहे, तो याच मातीत रुजलेल्या संस्कारांमुळे आहे. या मातीतच लहानाचा मोठा झालो." कर्नाटकमधील जनरल करियप्पाची एक आठवण सांगिताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "करियप्पा जेव्हा आपल्या गावी आले होते. त्यावेळी ते म्हणाले की, माझं जगभरातून आदरातिथ्य झालं. पण आपल्यामध्ये जो सम्नान, जो गौरव मिळतो, त्याचा अनुभव काही वेगळाच असतो."

वडनगरच्या भूमीला पंतप्रधानांचं वंदन

ते पुढे म्हणाले, या संपूर्ण क्षेत्राने माझ्यावर खूप प्रेम केलं. मी तुम्हा सर्वांना वंदन करतो. मी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, त्यावेळी सर्वात आधी पुरात्त्व खात्याला वडनगरमध्ये खोदकाम करण्याच्या सूचना केल्या. या खोदकामातून जे काही प्राप्त झालं, ते संपूर्ण जगासाठी आकर्षणाचं केंद्र बनलं. या खोदकामानंतर वडनगरमध्ये 2500 वर्षांपासून मनुष्यवस्ती असल्याचं पुरात्त्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसेच चीनचे जगप्रसिद्ध बौद्ध भिख्खू ह्वेनसांग यांनीही वडनगरमध्ये वास्तव्य केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

इंद्रधनुष्य मध्ये सर्वांनी सहभागी व्हा

इंद्रधनुष्य योजनेबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, "आज वडनगरमध्ये अनेक कार्यक्रमाद्वारे लोकहिताच्या कामांचं लोकार्पण झालं. पण यातील महत्त्वाचा म्हणजे, इंद्रधनुष योजनेचं लोकार्पण. देशातील ज्या मुलांचं लसीकरण होत नाही. त्यांना या मोहिमेतून नक्कीच लाभ होईल. त्यामुळे या योजनेत सर्वांनी सहभागी व्हावं."

मोदी व्यासपीठावर, तर त्यांचे भाऊ जनतेत

दरम्यान, या कार्यक्रमावेळी एक घटना सर्वांचंच लक्ष्य वेधून घेत होती. पंतप्रधान मोदी मंचावरुन जनतेला संबोधित करत होते. तर त्यांचे लहान भाऊ पंकज मोदी जनतेत राहून सर्वसामान्यांप्रमाणे मोदींचं भाषण ऐकत होते. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने त्यांच्याशीच बातचित केली, त्यावेळी आपण एक सर्वसामान्य व्यक्ती आहोत. कुणीही व्हीआयपी व्यक्ती नसल्याचं प्रांजळपणे कबूल केलं.

पंतप्रधान मोदींचं UNCUT भाषण पाहा

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV