मोदींच्या 'गुड मॉर्निंग' मेसेजला भाजप खासदारच उत्तर देत नाहीत!

पंतप्रधान मोदी दररोज 'नमो अॅप'वरुन सर्व खासदारांना 'गुड मॉर्निंग'चा मेसेज पाठवतात. पण या मेसेजला 4 ते 5 खासदार सोडता कोणताही खासदार उत्तर देत नाही. अशी नाराजी खुद्द मोदींनीच व्यक्त केली.

मोदींच्या 'गुड मॉर्निंग' मेसेजला भाजप खासदारच उत्तर देत नाहीत!

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी दररोज 'नमो अॅप'वरुन सर्व खासदारांना 'गुड मॉर्निंग'चा मेसेज पाठवतात. पण या मेसेजला 4 ते 5 खासदार सोडता कोणताही खासदार उत्तर देत नाही. अशी नाराजी खुद्द मोदींनीच व्यक्त केली. भाजपच्या संसदीय मंडळच्या बैठकीत बोलत असताना त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

मोदींच्या नाराजीनंतर सर्वच खासदारांमध्ये याबाबत जोरदार चर्चा सुरु झाली. भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक संपताच सर्व खासदारांना मेसेज पाठवण्यात आले की, त्यांनी आपलं 'नमो अॅप' नियमितपणे तपासावं. जर ते अॅक्टिव्हेट नसेल तर तात्काळ अॅक्टिव्ह करुन घ्यावं.

या मेसेजनंतर दुपारी जेवणाच्या वेळी भाजपचे सर्वच खासदार 'नमो अॅप' अपडेट करताना दिसून आले. खरं तर नमो अॅप अॅक्टिव्ह करण्यासाठी ईमेल आयडी आणि फोन नंबर पुरेसा असतो. त्यामुळे काही खासदारांनी आपल्या फोन नंबरऐवजी आपल्या स्वीय सचिवांचे नंबर दिले होते. तर काही जणांनी आपले फोन बदलल्यानं नमो अॅप अॅक्टिव्ह केलं नव्हतं.

नमो अॅप लाँच झाल्यानंतर पीएमओकडून खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे वेगवेगळे ग्रुप तयार करण्यात आले होते. ज्यामुळे त्यांना त्या-त्या ग्रुपमध्ये थेट मेसेज पाठवता येत होते. असे ग्रुप तयार केल्यानंतर पंतप्रधान मोदी स्वत: सर्व खासदार, मंत्र्यांना गुड मॉर्निंगचे मेसेज पाठवत होते. पण तंत्रज्ञानाबाबतची उदासिनता म्हणा किंवा नमो अॅप अॅक्टिव्ह न केल्यामुळे बरेच खासदार मोदींच्या मेसेजला कोणतंही उत्तर देत नव्हते. यावरुन मोदींनी नाराजी व्यक्त करताच सर्व खासदारांनी आपलं नमो अॅप अॅक्टिव्हेट केलं.

या सर्व प्रकारानंतर भाजपच्या आयटी सेलमधून एका कार्यकर्त्याला संसदेत पाठवण्यात आलं. त्यानंतर या कार्यकर्त्यानं प्रत्येक खासदार, मंत्र्यांचे मोबाइल नंबर तपासले. ज्यामधील 40% खासदारांचे नंबरच बदलले होते. तर भाजपच्या 19 मुख्यमंत्र्यांपैकी 13 मुख्यमंत्र्यांचे देखील मोबाइल नंबर बदलले होते. त्यामुळे या कार्यकर्त्यानं सर्व खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे मोबाइल क्रमांक घेतले आणि त्यांना 'नमो अॅप' अपडेट करण्याची विनंती केली.

सुत्रांच्या माहितीनुसार, सर्व खासदार आणि मंत्र्यांनी 'नमो अॅप' अपडेटही केलं आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदींनी उद्या गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवल्यानंतर खासदार आणि मंत्री त्यांना त्याचं उत्तर नक्कीच देतील.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: pm modis complaints from mps in bjp parliamentary party meeting latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV