भाजपला पाडण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्यात आले : मोदी

भाजपला गुजरातमध्ये पराभूत करण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्यात आले. पण तरीही गुजरातमधील जनतेने भाजपलाच विजयी केलं, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा समाचार घेतला.

भाजपला पाडण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्यात आले : मोदी

नवी दिल्ली : भाजपला गुजरातमध्ये पराभूत करण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्यात आले. पण तरीही गुजरातमधील जनतेने भाजपलाच विजयी केलं, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा समाचार घेतला. ते भाजप मुख्यालयात आयोजित सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

LIVE UPDATE

देश नव्या बदलासाठी तयार आहे, हे या निकालांनी दाखवून दिलं : मोदी

तुम्ही विकासाला प्राधान्य नाही दिलं तर पाच वर्षांनी जनता तुम्हाला स्वीकारणार नाही, हे हिमाचलच्या निकालाने दाखवून दिलं : मोदी

गुजरातमध्ये भाजपने प्रत्येक विधानसभा, लोकसभा निवडणूक जिंकली, हा विजय फक्त विकासाच्या मुद्द्यावर मिळाला : मोदी

वैयक्तिकरित्या माझ्यासाठी गुजरातचा विजय हा आनंद द्विगुणित करणारा : मोदी

मी गुजरात सोडल्यानंतर गुजरातच्या कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारे राज्य सांभाळलं ते माझ्यासाठी आनंद द्विगुणित करणारं : मोदी

चारही बाजूने हल्ले होत होते, अपप्रचार केला जात होता, भाजपला एकदा तरी पाडण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्यात आले : मोदी

एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर काही जण अस्वस्थ होते : मोदीट

भाजपचा सतत विकासाच्या मुद्द्यावर विजय होत असेल तर हे सत्य कधी ना कधी स्वीकारावंच लागेल : मोदी

2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात विकासाचं वातावरण तयार झालं, भाजप कुणाला पसंत असो किंवा नसो, पण देशाला विकासाच्या मुद्द्यावरुन दूर नेण्याचा प्रयत्न करु नका : मोदी

गुजरात, हिमाचलच्या विजयाने 'सब का साथ, सबका विकास' या मंत्रावर शिक्कामोर्तब केलं : मोदी

गुजरातमध्ये जातीयवादाचं जे विष पेरण्यात आलं ते त्यांनी नाकारलं, त्यामुळे गुजरातची जनता अभिनंदनाला पात्र, आणखी जागरुक होण्याची गरज : मोदी

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: pm modis speech on bjp victory in guja
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV