PNB घोटाळा : पंतप्रधान मोदींनी मौन सोडलं

आर्थिक घोटाळ्यांच्या बाबतीत सरकारचं धोरण झिरो टॉलरन्सचं असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

PNB घोटाळा : पंतप्रधान मोदींनी मौन सोडलं

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. आर्थिक घोटाळे कधीही सहन केले जाणार नाहीत, सरकार कठोर कारवाई करेल, असं मोदींनी दिल्लीतील ग्लोबल बिझनेस समिटमध्ये स्पष्ट केलं.

आर्थिक घोटाळ्यांच्या बाबतीत सरकारचं धोरण झिरो टॉलरन्सचं असल्याचं मोदींनी सांगितलं. सरकार आर्थिक विषयाशी संबंधित अनियमिततेविरोधात कठोर कारवाई करत आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली

'ज्या भिन्न वित्तीय संस्थांवर नियमनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, त्यांनी पूर्ण निष्ठेने आपलं कर्तव्य बजावायला हवं. विशेषतः ज्यांच्यावर देखरेख आणि मॉनिटरिंगचं काम सुपूर्द करण्यात आलं आहे, त्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी' असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात पंजाब नॅशनल बँक किंवा नीरव मोदी यांचा थेट उल्लेख केलेला नाही. घोटाळ्यावर मोदींनी मौन बाळगल्यामुळे विरोधकांनी हल्लाबोल केला होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही प्रश्न उपस्थित केले होते.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: PM Narendra Modi breaks silence on PNB scam in Global Business Summit latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV