या निवडणुकीतही मोदींना ‘हा’ इतिहास बदलता आला नाही!

गुजरातमधल्या 2002 च्या दंगलीनंतर अनेक मतदारसंघांची समीकरणं बदलली, शिवाय 2014 नंतर मोदीलाटेनंतरही मतांची समीकरणं बदलली, मात्र तरीही या चार मतदारसंघांमध्ये भाजपचा निभाव लागू शकला नाही. पुन्हा एकदा काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे.

या निवडणुकीतही मोदींना ‘हा’ इतिहास बदलता आला नाही!

गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. काही जागांवरील निकालही लागला आहे. गुजरातमध्ये असे काही मतदारसंघ आहेत, जिथे कायम काँग्रेसचाच उमेदवार निवडून येतो. मोदींचा करिष्मा असतानाही, यावेळी इथे हा इतिहास अबाधित राहिला असून, चारही जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.   

खेडा जिल्ह्यातील महुधा मतदारसंघ, आणंद जिल्ह्यातील बोरसाड मतदारसंघ, झागडिया जिल्ह्यातील भरुच मतदारसंघ आणि तापी जिल्ह्यातील व्यारा मतदारसंघ, हे चार मतदारसंघ असे आहेत, जे काँग्रेसचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात. मोदी लाट असो वा विकासाच्या मॉडेलचा गवगवा, काहीही झालं तरी इथे केवळ काँग्रेसच जिंकते.

गुजरातमधल्या 2002 च्या दंगलीनंतर अनेक मतदारसंघांची समीकरणं बदलली, शिवाय 2014 नंतर मोदीलाटेनंतरही मतांची समीकरणं बदलली, मात्र तरीही या चार मतदारसंघांमध्ये भाजपचा निभाव लागू शकला नाही. पुन्हा एकदा काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे.

कुठल्या जागेवर कोण जिंकला?

  • व्यारा मतदारसंघ – गमित पुनाभाई (काँग्रेस)

  • बोरसाड मतदारसंघ – परमार राजेंद्रसिंह (काँग्रेस)

  • झागडिया मतदारसंघ – बाहुबली छोटभाई वसावा (काँग्रेस)

  • महुधा मतदारसंघ – इंद्रजीत सिंह परमार (काँग्रेस)

एकंदरीत, गुजरातमध्ये भलेही पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली असेल, मात्र या पारंपरिक काँग्रेसचे मानले जाणारे बालेकिल्ले भेदण्यात पुन्हा मोदी आणि त्यांच्या भाजपला अपयश आले आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Modi can’t c
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV